मुख्य बातम्या

मानव विकास परिषदेच्या वतीने रांजणगाव मध्ये संविधान दिनानिमित्त MPSC च्या विद्यार्थ्यांचा सत्कार

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे संविधान दिनाचे औचित्य साधुन मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिरुर तालुक्यातील MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 11 विद्यार्थ्यांची विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, जिल्हाध्यक्ष संतोष कुटे, शिरुर तालुका कायदा सल्लागार मीना गवारे, तालुका कार्याध्यक्ष शहाजी खळदकर, तालुका उपाध्यक्ष वैशाली बांगर, तालुका संपर्क प्रमुख पत्रकार किरण पिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य कविता खेडकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, ग्रामपंचायत सदस्य प्रताप फंड, अनिता बांदल, दत्तात्रय हरगुडे, श्रीकांत पाचुंदकर, विवेक फंड, भानुदास शेळके तसेच ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना गवारे, सूत्रसंचालन सचिन हरगुडे तर आभार संदीप कुटे यांनी मानले.

या कार्यक्रमात 26/11 हल्ल्यात मृत पावलेल्या शहीदानां श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मानव विकास परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालय, शिक्रापुर, शिरुर आणि रांजणगाव MIDC तील पोलिस ठाण्यात जाऊन संविधानाच्या प्रती पोलिस कर्मचाऱ्यांना प्रति वाटण्यात आल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

5 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago