मुख्य बातम्या

शिरुर-चौफुला रस्त्यावर अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

न्हावरे (तेजस फडके) शिरुर-चौफुला रस्त्यावर आंधळगाव फाटा येथे दुचाकी आणि पिकअप यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला असुन दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी पिकअप चालक दत्तात्रय रामचंद्र कदम (रा. रामलिंग, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे विकास रोहीदास मदने (वय ३६, रा. नागरगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असुन त्यांचा भाऊ संदीप मदने आणि त्यांचा सहकारी विक्रम महादेव सकट (वय ३२) रा. आंधळगाव याला दुचाकीवरुन (एम एच १२ एन एस २७९६) घेऊन आंधळगाव फाट्यावरून चौफुला-शिरुर रस्त्याने कामासाठी निघाले होते. यावेळी समोरुन भरधाव आलेली पिकअप क्रं (एम एच १२ एस एक्स ४८३५) चालक दत्तात्रय कदम याने निष्काळजीपणे गाडी चालवत त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात संदीप मदने यांना किरकोळ दुखापत झाली, मात्र विक्रम सकट गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान संदीप मदने यांचा मृत्यू झाला. अपघातात मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पिकअप चालक दत्तात्रय रामचंद्र कदम याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कुठे जल्लोष, कुठे निराशा!

शिरुर; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश : म्होरक्यासह दोघांना अटक, ६ गुन्हे उघड

शिरूरमध्ये ऑनलाईन सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

4 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

13 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

13 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

14 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

19 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

19 तास ago