शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका वादग्रस्त रस्त्याच्या खुल्या वापराबाबत तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाला स्थानिक चार व्यक्तींनी थेट विरोध दर्शवून प्रशासनालाच आव्हान दिले. याप्रकरणी संबंधित चार आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत फिर्यादी श्रीमती प्रमिला नागेश वानखेडे (वय 42 वर्षे ) व्यवसाय – तलाठी, रा. खराडी बायपास, ता. हवेली, जि. पुणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरसगाव फाटा ते पिंपळसूटी या रस्त्याच्या तात्पुरत्या खुल्या वापरासंदर्भात तहसीलदार शिरूर यांनी स्पष्ट आदेश दिला होता.
त्यानुसार फिर्यादी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपी १ ) ताराबाई पोपट भोईटे २ ) खंडू पोपट भोईटे ३ ) महेश पोपट भोईटे ४) दादा पोपट भोईटे हे सर्व रा. शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे यांना रस्ता खुला करण्याची विनंती केली. मात्र, आरोपींनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाच्या आदेशास विरोध केला होता. त्यावेळी आरोपी खंडू भोईटे याने उघडपणे सांगितले की, “आम्ही कोणाचाही आदेश पाळणार नाही. आमची जमीन मोजणी होईपर्यंत आम्ही रस्ता मोकळा करणार नाही. तुम्हाला काय ते गुन्हा दाखल करा.” यावेळी इतर आरोपींनीही यास दुजोरा दिला.
या प्रकारामुळे तहसीलदारांच्या आदेशाचा थेट अवहेलना झाल्याने, संबंधित चार जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी पो.हवा शिंदे हे तपास करत असून या प्रकरणाच्या तपासासाठी प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजाळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासनाचे आदेश न पाळल्यास कायदेशीर कारवाई कशी होऊ शकते, याचे ठोस उदाहरण निर्माण झाले आहे. शासकीय आदेशांना विरोध करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलीस यंत्रणा तत्पर आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…