मुख्य बातम्या

पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम

शिरुर (तेजस फडके) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व साधारण सभेत शेतकऱ्यांची बाजु मांडण्यासाठी मी व्यासपीठावर जात असताना रांजणगाव MIDC तील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणुन माझ्या अंगावर सोडण्यात आले. तसेच मला व्यासपीठावर जाण्यासाठी रोखण्यात आले आणि खाली ढकलण्यात आले हा माझा अपमान नसुन सर्व शेतकऱ्यांचा अपमान असल्याची टिका देवदत्त निकम यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचें आंबेगाव-शिरुर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांनी आज (दि २३) रोजी पाबळ-धामारी गणातील धामारी, खैरेनगर, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, हिवरे,खैरेवाडी, पाबळ या गावांचा दौरा केला. त्यावेळेस खैरेवाडी येथे ते बोलत होते. खैरेवाडी ग्रामस्थांनी मोठया उत्साहात ‘आमदार’ मजकुर टाकत फुलांच्या पायघड्या घालुन देवदत्त निकम यांचं स्वागत केलं. यावेळी मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना निकम म्हणाले, सध्याच्या महायुती सरकारने कष्टकरी आणि शेतकऱ्यांची वाट लावली असुन दुधाला कमीत कमी ३५ अन कांद्याला प्रति दहा किलो कमीत कमी २०० रुपये बाजारभाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्या हातात पैसे राहतात. परंतु सरकारने लाडक्या बहिणीला महिन्याला १५०० रुपये दिले. परंतु तेलाच्या डब्याची किंमत मात्र २००० रुपये केली. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही.

 

माझ्या समोर तुल्यबळ उमेदवार आहे. त्यांना पवार साहेबांनी आमदार केलं. अनेक वर्षे मंत्रीपद दिल. परंतु वाईट काळात ते साहेबांना सोडुन गेले. परंतु आम्ही मात्र स्वाभिमान जपत पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलो. त्यामुळे आता ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवतील. पण त्यांनी आजपर्यंत जे पण काही कमवलं आहे. ते पवार साहेबांमुळेच कमवलं आहे. त्यामुळे तुम्ही जे पण काही येईल ते घ्या. पण मतदान करताना मात्र त्यांनी ऐन संघर्षाच्या काळात पवार साहेबांची सोडलेली साथ विसरु नका आणि त्यांना त्यांची योग्य जागा दाखवा असेही निकम म्हणाले.

शिरुर-हवेली मधुन महाविकास आघाडीच्या वतीने अ‍ॅड अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज

शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’ चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago