शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेली मतदार संघातुन महायुतीकडुन कोण उमेदवार असणार हे अजुनही निश्चित झालेले नाही. महायुतीचा शिरुर-हवेलीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र महाविकास आघाडीकडुन शिरुर-हवेलीत आमदार अॅड अशोक पवार यांचं मात्र उद्या २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच निश्चित झालं असुन अर्ज भरण्यापुर्वीच अशोक पवार यांनी सगळीकडे प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे.
उद्या गुरुवार (दि २४) रोजी शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडुन अॅड अशोक पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उद्योजक प्रकाश धारिवाल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके यांच्या उपस्थित महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?
शिरुर; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार:- संगीता राजापूरकर