मुख्य बातम्या

शिक्रापुरात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ च्या शाखेला भीषण आग, महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये बँक पुर्णपणे जाळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन दोन अग्निशमक बंबाच्या सहाय्याने आग विजावण्यात यश आले असून मोठी दुर्घटना टळली आहे.

शिक्रापुर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेसमोरुन महिला पोलीस हवालदार किरण निकम या पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी जात असताना त्यांना बँकेच्या आतमधून धुराचे लोळ येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनसह अग्निशमक दलाला माहिती दिली. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, किरण निकम, ललित चक्रनारायण, बँकेचे व्यवस्थापक अमोल नफाडे, ग्रामपंचायत सदस्य पुजा भुजबळ, त्रिनयन कळमकर, दिपक भुजबळ, नाना गिलबिले, ओंकार हिरवे, सोमनाथ भुजबळ यांसह आदींनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

काही वेळाने पुणे महानगर विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील दोन अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रांजणगाव औद्योगिक वसाहतचे उपअग्निशमन अधिकारी महेंद्र माळी, अशोक हातवटे, अमोल गायकवाड, सचिन शेंडगे, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अल्ताब पटेल, लक्ष्मण मिसाळ, प्रशांत अडसूळ, महेश पाटील, संकेत कुंभार, कृष्णा नांगरे यांसह आदींनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली.

 

मात्र आगीमध्ये बँकेचे सर्व साहित्य, कागदपत्रे, कॉम्प्युटर, फर्निचर जाळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले मात्र बँकेचे मुख्य लॉकर सुरक्षित राहिले असल्याचे दिसून आले, मात्र यावेळी लागलेली आग नेमकी कशाने लागली याबाबत काही समजू शकले नाही. तर ऐन वर्दळीच्या ठिकाणी व मनुष्यवस्ती मध्ये असलेल्या बँकेला लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली आहे.;

शिरुर-हवेली मधुन महाविकास आघाडीच्या वतीने अ‍ॅड अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज

शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

शिरुर-आंबेगावच्या वाल्या चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

24 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

29 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

35 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

39 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

7 तास ago