मुख्य बातम्या

शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आपल्याकडे गौरी, गणपती, नवरात्री हे उत्सव अशा विविध प्रकारचे धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्यात पुर्वी अनेकवेळा प्लास्टिक, थर्माकॉल आणि इतर वस्तु आपण सजावटीला वापरायचो. परंतु सध्या पर्यावरणपुरक उत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आता आपण शाडूच्या मातीपासुन गणपती किंवा पर्यावरणपुरक विघटित होणारा कचरा यापासुन सजावट करण्याकडे सध्या लोकांचा कल वाढला असल्याचे प्रतिपादन शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी केले.

 

शिरुर तालुका डॉट कॉम आणि रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गौरी व गणपती घरगुती सजावट स्पर्धा २०२४ च्या बक्षीस वितरण कार्यक्रमात महेश डोके हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यामुळे घरगुती गौरी आणि गणपती स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वच महिला भगिनींचे अभिनंदन केले. तर शिरुर शहर तसेच शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात हा उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचेही कौतुक केले.

 

शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीमधील संपदा पतसंस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात मंगळवार (दि २४) रोजी गौरी व गणपती घरगुती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झाली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

 

महाराष्ट्र राज्यात शहरांसह ग्रामीण भागातही गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत १० दिवस वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच या काळात अनेक ठिकाणी घरगुती गौरी व गणपतीची सजावटही खुपच छान पद्धतीने केलेली असते. गौरी व गणपतीची घरगुती प्रदुषण विरहित सजावट, स्वतःच्या हाताने टाकाऊ वस्तु पासुन टिकाऊ सजावट व्हावी, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रेरणा मिळावी तसेच त्यांच्या कलेचे कौतुक व्हावे. यासाठी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच शिरुर तालुका डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 

यावेळी शिरुर शहर तसेच शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागातुन घरगुती गौरी सजावट स्पर्धेत १५० तर घरगुती गणपती सजावट स्पर्धेत १०० असे एकुण २५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या पर्यवेक्षक म्हणुन शर्मिला नीचित यांनी काम पाहिले. अतिशय पारदर्शक पद्धतीने या स्पर्धेतल्या विजेत्यांची निवड करण्यात आली. गौरी व गणपती स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह तसेच भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच स्पर्धकांना सहभागी झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले.

 

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी डोके यांनी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

 

घरगुती गौरी सजावट स्पर्धेतील विजेते 

१) वैशाली हारके

२) प्रियंका कोठारी

३) शोभा मचाले

४) मनीषा कालेवर

५) गौरी घावटे

 

घरगुती गणपती सजावट मधील विजेते 

१) मेघा गायकवाड,

२) इंद्रजित थोरात,

३) सौदामिनी शेटे

४) प्रतीक्षा भावटणकर

५)अद्वैत पाटील

 

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेशध्यक्षा शोभना पाचंगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश देशमुख, नानासाहेब काळे, पत्रकार अरुणकुमार मोटे, सागर नरवडे, कलीम सय्यद, वृषभ मुथा, अक्षय सोनवणे, पत्रकार संजीवनी कदम, रेश्मा शेख, राणी शिंदे, डॉ वैशाली साखरे, कल्पना चांदगुडे, दुर्गा ननवरे, शितल शर्मा, भाग्यश्री लिंगे, ललिता पोळ, मनीषा टेंभेकर, अनुपमा दोषी, सुवर्णा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तेजस फडके यांनी तर प्रास्ताविक व आभार राणी कर्डिले यांनी मानले.

शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई

वाघाळे येथे वादळी पावसाने ऊस, मका भुईसपाट

शिरुर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करुन अनोखे आंदोलन

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago