शिरुर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करुन अनोखे आंदोलन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातुन जाणाऱ्या पुणे-नगर या मुख्य रस्त्यावर पाबळफाटा ते पाषाणमळा या भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन खड्डे पडलेले असल्याने शिरुर नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पाबळफाटा येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी, शिरुर शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, संदिप कडेकर, ॲड सुभाष छाजेड, सागर परदेशी, प्रदिप तिवारी, सुरेश पाटील यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शिरुर शहरातुन जाणाऱ्या या मुख्य पुणे-नगर रस्त्यावर शालेय विद्यार्थी, नागरिक, महिला व प्रवाशांसह मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पाबळफाटा ते पाषाणमळा रस्त्यावरुन जात असताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे…? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत आहेत.

तसेच पाषाणमळा येथील ओढ्यावरील पुलाचे कठडे हि तुटलेले असुन या रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहे. अनेकवेळा निवेदन देऊन व मागणी करुनही या रस्त्याचे काम होत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्याची पुजा व आरती करुन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सावळेराम अवारी आणि नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रितेश फुलडाळे, मनसेचे संदिप कडेकर सामाजिक कार्यकर्ते सुभाष छाजेड व उपस्थितांनी सांगितले.

करडे येथे ट्रॅक्टर व हायवा कंपनीत लावली नसल्याने काठी व हॉकीस्टीकने कंपनीच्या मॅनेजरला जबर मारहाण

शिरुर; वाळु माफियांचा आणखीन एक कारनामा; तहसीलदार पाठीमागे लागताच रस्त्यावरच टाकली वाळू

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली