waghale-sugarcane
वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. २३) सायंकाळी सहाचे सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने ऊस, मका, कडवळ ही पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत.
वाघाळे आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने कांद्याची रोपे खराब झाली होती. उरलेल्या रोपत शेतकऱ्यांनी कशीबशी कांदा लागवड केली होती. पण रात्री पावसाचा जोर इतका होता की शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. कांद्यात सकाळी दहा वाजेपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी माहिती माजी चेअरमन सूर्यकांत बढे यांनी दिली.
वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने ताबडतोब पहाणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी दादासाहेब सोनवणे उपसरपंच, माजी चेअरमन दिलीप थोरात, एकनाथ डफळ, नितीन भोसले, राजू माकर, बाळासाहेब थोरात, अंकुश शेळके, योगेश डफळ दत्तात्रय थोरात आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!
Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!
वाघाळे विविध विकास सोसायटी कडून सभासदांना दहा टक्के लाभांश!
कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…
हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…
मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…