मुख्य बातम्या

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा उद्योगांना फटका; चाकणनंतर शिरुर औद्योगिक वसाहत स्थलांतराची भीती…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीचा थेट फटका रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत, सणसवाडी आणि कोरेगाव परिसरातील उद्योगांना बसू लागला आहे. कच्चा माल, तयार माल, अवजड वाहने तसेच हजारो कामगारांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे उद्योगांच्या उत्पादन व्यवस्थेवर आणि मालवाहतुकीच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी Industrial Federation of Maharashtra (IFM) – Region च्या वतीने मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडीने उद्योगांचे गणित बिघडले
पुणे-अहिल्यानगर महामार्ग हा पुणे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वाहतूक मार्गांपैकी एक आहे. रांजणगाव, सणसवाडी आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांना कच्चा माल पोहोचविणे, तयार माल बाजारपेठेत पाठविणे तसेच कामगारांची ये-जा यासाठी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. मात्र, वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्याची वाहतूक क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापन अपुरे पडत असल्याने अनेक वेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काही वेळा वाहने तासनतास कोंडीत अडकून पडत असल्याने मालवाहतुकीचा वेळ वाढतो. परिणामी उद्योगांच्या उत्पादन नियोजनावर, पुरवठा साखळीवर आणि कामगारांच्या वेळेवर त्याचा परिणाम होत असल्याचे औद्योगिक क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.

‘चाकण’ची पुनरावृत्ती होऊ नये…
चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर काही उद्योगांनी स्थलांतराचा विचार सुरु केल्याचे IFM ने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर रांजणगाव–सणसवाडी–कोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडीकडे वेळीच गांभीर्याने पाहिले नाही, तर भविष्यात येथील उद्योगांसमोरही स्थलांतराचा पर्याय निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

उद्योग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, जमीन, मनुष्यबळ आणि गुंतवणूक लागते. त्यामुळे एखाद्या औद्योगिक पट्ट्यात उद्योग आल्यानंतर केवळ नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर न देता विद्यमान उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे सातत्याने संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रश्न केवळ वाहतुकीचा नाही; रोजगाराचाही आहे…
वाहतूक कोंडीचा परिणाम केवळ वाहनचालक किंवा प्रवाशांपुरता मर्यादित राहत नाही. औद्योगिक वाहतूक विस्कळीत झाल्यास कच्चा माल वेळेवर पोहोचणे, तयार मालाची वाहतूक, पुरवठा साखळी आणि उत्पादनाचे नियोजन यावर परिणाम होऊ शकतो. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम उद्योगांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या रोजगारावरही होण्याची शक्यता असते.

महाराष्ट्रात नवीन उद्योग आणणे आणि गुंतवणूक वाढविणे आवश्यक आहेच; मात्र त्याचबरोबर राज्यात आधीपासून कार्यरत असलेले उद्योग टिकवून ठेवणे, त्यांना सक्षम पायाभूत सुविधा देणे आणि रोजगाराच्या संधी सुरक्षित ठेवणेही शासनासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. त्यामुळे रांजणगाव–सणसवाडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा केवळ वाहतुकीचा प्रश्न न राहता उद्योग, रोजगार आणि आर्थिक विकासाशी निगडित प्रश्न बनला आहे.

उद्योजकांसोबत तातडीने बैठक घेण्याची मागणी…
रांजणगाव–सणसवाडी–कोरेगाव परिसरातील उद्योजक तसेच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत शासनाने तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी IFM ने केली आहे. या बैठकीत वाहतूक कोंडीची कारणे, सध्याच्या वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि भविष्यातील औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन ठोस कृती आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तात्पुरत्या स्वरुपातील उपाययोजनांपेक्षा वाढती औद्योगिक आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि औद्योगिक वाहतुकीसाठी प्रभावी नियोजन याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.

‘वेळीच जागे व्हा’, उद्योग क्षेत्राचा इशारा
“चाकणप्रमाणे रांजणगाव–सणसवाडी परिसरातील उद्योगांनाही भविष्यात स्थलांतराचा विचार करण्याची वेळ येऊ नये,” यासाठी शासनाने आताच ठोस पावले उचलण्याची गरज आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची वाट न पाहता उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी Industrial Federation of Maharashtra (IFM) – Region च्या वतीने करण्यात आली आहे.

रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि सणसवाडी–कोरेगाव परिसर हा पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा पट्टा आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करणे ही केवळ स्थानिक गरज नसून भविष्यातील औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या दृष्टीनेही अत्यावश्यक बाब ठरत आहे.

महाराष्ट्रातील 10 प्रमुख MIDC; पुणे ठरतेय औद्योगिक केंद्र, उद्योजकांच्या स्थलांतराने राजकारण तापले

‘रांजणगावमधील तुझे दिवस संपले’ MIDC मध्ये HR मॅनेजरला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज 

चाकण MIDCला मोठा धक्का? 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव MIDC मध्ये औद्योगिक शांततेसाठी पोलीस-उद्योग प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

13 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

16 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

16 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago