शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): स्वप्नांना वयाचे बंधन नसते, हे दाखवून देणारा भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग शिरूर तालुक्यातील सातकरवाडी येथे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला. जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या शौर्य रवींद्र टेमगिरे याने भविष्यात शिरूर तालुक्याचा आमदार होऊन आपल्या गावासह संपूर्ण तालुक्यासाठी मोठे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शौर्यने आपल्या निरागस शब्दांत मोठे स्वप्न व्यक्त केले. “मी अजून लहान आहे. मला स्वातंत्र्य म्हणजे काय, हे समजत नाही; पण मोठा झाल्यावर शिरूरचा आमदार होऊन गावासाठी आणि तालुक्यासाठी मोठे काम करणार,” असे त्याने सांगितले.
शौर्यच्या या निरागस संकल्पाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्याच्या आत्मविश्वासाचे आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेचे उपस्थितांनी कौतुक केले. लहान वयातच मोठे ध्येय उराशी बाळगणाऱ्या शौर्यला यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शक शिक्षक पोपट रासकर, मुख्याध्यापिका संगिता वाघ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनय सातकर, शिवसेनेचे एकनिष्ठ ऋषिकेश टेमगिरे, विवेक सातकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कोकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी चिमुकल्या शौर्यच्या ध्येयाचे कौतुक केले.
आज शौर्यला स्वातंत्र्याचा अर्थ कदाचित पूर्णपणे समजत नसेल; मात्र मोठे होऊन गाव, तालुका आणि समाजासाठी काम करण्याचे त्याचे स्वप्न निश्चितच प्रेरणादायी आहे. चिमुकल्या शौर्यच्या या संकल्पाने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स,…
सुनेत्रा अजित पवार यांच्या पुढाकारातून आमदारांचा स्तुत्य निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेतनाचे धनादेश सुपूर्द…
मुंबई : राज्यभर चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या नवनिर्वाचित संचालक…
मुंबई: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आणि दीपावलीच्या मंगल पर्वाचे औचित्य…
जानेवारीपासून परीक्षांना सुरुवात; पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएमसाठी प्रथमच सीईटी मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
रोहयो आणि ‘व्हीबी जी राम जी’च्या कामांना गती द्या; जलसंधारण, चारा उपलब्धता आणि प्रलंबित देयकांवर…