मुख्य बातम्या

खासदार डॉ अमोल कोल्हे यांना पुर्वा वळसे पाटील यांच्याकडुन विजयाच्या शुभेच्छा अन चर्चांना उधाण…

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पुर्वा वळसे पाटील यांनी त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “डॉ अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय; मनःपूर्वक अभिनंदन” असा मजकुर टाकत त्यांनी सोशल मिडीयावर डॉ कोल्हे यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षात येण्यास इच्छुक असल्याची सगळीकडे जोरदार सुरु झाली आहे.

शिंदेची बंडखोरी अन राजकारणात उलथापालथ…
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली. पाच वर्षांपुर्वी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून दुर ठेवत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडुन भाजपासोबत सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवारांचं बंड अन राष्ट्रवादीत फुट…
त्यानंतर काही दिवसात अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ३० पेक्षा जास्त आमदार फोडुन भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांनी अजित पवार यांना साथ देत सरकार मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतला.

पाचही आमदार अजित पवारांसोबत…
परंतु पुणे जिल्ह्यातील खेड दिलीप मोहीते, जुन्नर अतुल बेनके, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, भोसरी महेश लांडगे आणि हडपसर चेतन तुपे या पाच आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. त्यानंतर राष्ट्रवादी हे नाव घड्याळ चिन्ह सुद्धा अजित पवार यांना मिळाले. त्यानंतर काही दिवसातच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. दिलीप वळसे पाटील यांचे जुने सहकारी मित्र शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) मध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव विरुद्ध कोल्हे अशी समोरासमोर लढत झाली.

डॉ अमोल कोल्हे यांच्यासोबत जनशक्ती…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात होताच दिलीप वळसे पाटील यांना अपघात झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे वळसे पाटील प्रचारात सामील होऊ शकले नाहीत. परंतु शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आधी शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) नंतर शिवसेना (शिंदे गट ) आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे पक्ष बदलल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त करत मोठया मताधिक्याने डॉ अमोल कोल्हे यांना निवडुन देत पुन्हा खासदार म्हणुन दिल्लीत पाठवले.

पुर्वा वळसे यांच्याकडुन शुभेच्छा अन चर्चांना उधाण…
डॉ अमोल कोल्हे यांचा निवणुकीत विजय झाल्यानंतर पुर्वा वळसे पाटील यांनी सोशल मिडीयावर “डॉ अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय; मनःपूर्वक अभिनंदन” असा मजकुर टाकत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असुन  सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षात येण्यास इच्छुक असल्याचीही सगळीकडे जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

शिरुर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुंबई येथील तळोजा जेल जवळून आरोपी फरार

महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मतदारांनी दाखवून दिलं; ये ‘दादागिरी’ नही चलेगी, करारा ‘जबाव’ मिलेगा

शिरुर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देणार का…?

शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन तालुकाध्यक्षाच्या गावातच डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, सौरव दास-आशुतोष रांका सहसंयोजक

मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक…

11 मिनिटे ago

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

14 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

14 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

18 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

18 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

18 तास ago