मुख्य बातम्या

शिरुर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुंबई येथील तळोजा जेल जवळून आरोपी फरार…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरमधील जैन मंदीरातील चोरी प्रकरणी शिरुर पोलिसांनी तळोजा कारागृह, ठाणे येथून वर्ग करुन तपासाकामी शिरुर येथे आरोपीला आणले होते.तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीला पुन्हा तळोजा कारागृहात दाखल करण्यासाठी नेत असताना तीन आरोपींपैकी एक आरोपी मुजाहीद गुलजार खान (रा. कारेगाव ता. शिरुर, मुळ रा. झारखंड) हा तळोजा कारागृहाजवळून शिरुर पोलिसांना हिसका देऊन फरार झाला आहे.

 

याबाबत सविस्तर माहीती अशी की, काही दिवसांपुर्वी घरफोडया, मंदीर चोऱ्यामध्ये रबाळे पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले होते. महाराष्ट्रातुन शिरुरसह अनेक ठिकाणाहुन चोऱ्या केल्याचे चोरट्यांनी कबुल केले होते. तपासाकामी त्यांना शिरुरला आणले होते. शिरुर पोलिसांनी तपास केल्यानंतर पुन्हा (दि ५) जुन रोजी आरोपींना तळोजा कारागृहात हजर करण्याकामी शिरुर पोलिस घेऊन गेले असता तीन आरोपींपैकी मुजाहीद गुलजार खान या आरोपीने तळोजा कारागृहाजवळ पोटात दुखत असल्याचे नाटक करत पोलिसांना झटका देऊन तो पळून गेला आहे. शिरुर पोलिसांसह, क्राईम ब्रँचचे पथक त्याचा शोध घेत आहे.

शिरुर पोलिसांचा हलगर्जीपणा नडला…?

ठाणे येथील तळोजा जेलला आरोपी नेताना पोलिसांनी सरकारी वाहन वापरले नसुन शस्त्र ही बरोबर नेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अट्टल चोर आहे हे माहीती असूनही हलगर्जीपणा झाल्याने आता वरीष्ठ काय कारवाई करतात. याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. यापुर्वीही पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शिरुर येथील सबजेल मधुन एक आरोपी पळाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा शिरुर पोलिसांच्या ताब्यातील आरोपी तळोजा जेलजवळून पळुन गेला आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

( क्रमशः )

शिरुर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देणारका..?

शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन तालुकाध्यक्षाच्या गावातच डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

12 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago