amol kolhe

शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन तालुकाध्यक्षाच्या गावातच डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी…

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके): लोकसभेच्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदार संघ खुपच चर्चेत आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघात मोठी ताकत लावली होती. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा अपवाद वगळता खेड, आंबेगाव, जुन्नर, हडपसर या ठिकाणचे चार आमदार हे अजित पवार गटाचे तर भोसरी विधानसभा मतदार संघांचे आमदार हे भाजपाचे होते. पाच विधानसभा मतदार संघात भोसरी वगळता इतर मतदार संघात अमोल कोल्हे यांना आघाडी मिळाली आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ कोल्हे यांना पाडण्यासाठी पाचही मतदार संघात मोठी ताकत लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच भाजपा, शिंदे गट आणि घटक पक्षाचे सगळे पदाधिकारी पायाला भिंगरी लाऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करत होते. परंतु सर्वसामान्य लोकांनी हि निवडणुक हातात घेत अमोल कोल्हे यांच्या बाजुने कौल दिला. त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच हि निवडणुक झाली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) शिरुर-आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या रांजणगावमध्ये डॉ कोल्हे यांना 859 मतांची तर शिरुरचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांच्या निमोणे गावात डॉ कोल्हे 581 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे स्वतःच्या गावातच या नेत्यांचं कुणी ऐकलं नसुन सर्वसामान्य लोकांनी शरद पवारांना साथ देत डॉ अमोल कोल्हे यांनाच पसंती दिली आहे. तसेच जय मल्हार क्रांती सेनेचे दौलत शितोळे यांनी शिरुर येथील जाहीर सभेत शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरुर तालुक्यातुन एक लाखांचे मताधिक्य देणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांच्या शिंदोडी गावातचं डॉ कोल्हे यांना 200 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे नेत्यांनी केलेल्या मोठया मोठया वलग्ना निष्फळ ठरल्या आहेत.

 

शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्वच बडे नेते अजित पवार यांच्यासोबत होते. परंतु सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदार मात्र शरद पवार यांच्यासोबत होते. त्यामुळे शिरुर लोकसभेत शरद पवार यांचा पॅटर्न चालला आहे.

 

तीन तिघाडी अन काम बिघाडी…
शिरुर लोकसभेला भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) या तीन प्रमुख पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. मात्र निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इतर दोन पक्षाचे कार्यकर्ते यांचं ‘मनोमिलन’ योग्य प्रकारे नं झाल्याने ‘तीन तिघाडी अन काम बिघाडी’ असाच काहीसा प्रकार प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पहायला मिळाला.

 

शिरुर ग्रामीण मध्येही कोल्हे यांना लिड…
शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात अमोल कोल्हे यांना अनेक गावात मताधिक्य मिळाले.

शिरुर ग्रामीण मध्ये गावनिहाय मिळालेले मताधिक्य खालीलप्रमाणे
शिरुर ग्रामीण 250 मते
शिरुर शहर 358 मते
कर्डेलवाडी 258 मते
सरदवाडी 12 मते
आण्णापुर 55 मते
निमोणे 581
शिंदोडी 200

या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला…
शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, राजेंद्र जगदाळे, तर शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, शिरुर ग्रामीणचे माजी सरपंच विठ्ठल गावठे, शिरुर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासुद, माजी नगरसेवक नितीन पाचर्णे, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, अमोल वर्पे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या सर्व दिग्गज नेत्यांना त्यांच्याचं कार्यकर्त्यांनी डावलल्याचे चित्र सगळीकडे पाहवयास मिळाले.

शिरुर मतदार संघात तुतारी वाजली, घड्याळाची टिकटिक बंद…

शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.अमोल कोल्हे विजयी…

शिरूर लोकसभा निवडणूकीत अमोल कोल्हे विजयाच्या उंबरठ्यावर; पाहा मतं…

अजित पवार म्हणाले, कसा निवडून येतो बघतोच; अमोल कोल्हे म्हणाले…

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे