मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान पाठलाग करत आरोपीना ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील कंपनीतून गुरुवार (दि 17) रोजी रात्री 11:30 च्या सुमारास कंपनीतून कामावरून सुटून पायी चाललेल्या कामगाराला विना नंबर असलेल्या दोन दुचाकी वरुन पाच जणांनी फायटरचा धाक दाखवत त्याच्याजवळील मोबाईल चोरुन मारहाण केली होती. त्यानंतर या युवकाने पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्तीला असताना पोलिसांना औद्योगिक वसाहतीत पाच जण संशयितरीत्या फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनीच त्या कामगाराचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडुन चोरलेला मोबाईल आणि दोन विना नंबर असलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

याबाबत 1) देवानंद विलास धवसे (वय 21) सध्या रा. कवठे येमाई, ता. शिरुर, जि. पुणे मूळ रा. सावळी बहिणाराव, ता. औंढानागनाथ, जि. हिंगोली, 2) शुभम बाळासाहेब कुंभार (वय 23), 3) अभिजित संतोष कांदळकर (वय 19) दोघेही रा. कवठे येमाई ता. शिरुर, जि. पुणे या तिघांना अटक करुन शुक्रवार (दि 18) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांना रविवार (दि 20) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुण्याचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, विजय सरजिने, पोलिस नाईक पांडुरंग साबळे, राजेश ढगे, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर, शुभम मुत्याळ यांनी केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

6 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago