शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांतील आरोपींना अटक करून एकुण ४ लाख ६८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल (दि २४) जुन रोजी, मूळ मालकांना परत करण्यात आला असुन या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शिरुर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पहिल्या घटनेत दि. ११ मे २०२५ रोजी रूपाली अनिल काळे (वय ४०, रा. त्रिमूर्ती नगर, बारामती) या महिलेचे ६.१ तोळ्यांचे, सुमारे ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण शिरुर बसस्थानक परिसरातून चोरीस गेले होते. या प्रकरणी आरोपी मनिषा विजय कसबे व शोभा शंकर दामोदर (दोघी रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) यांना अटक करुन कारवाई करण्यात आली होती. तसेच आरोपींकडून गंठण हस्तगत करण्यात आले होते.
दुसऱ्या घटनेत दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी छबुबाई नारायण बनसोडे (रा. पाचर्णेमळा, शिरुर) यांच्या जवळील एकूण ७८ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र व सोन्याचे कानातील फुल चोरीस गेले होते. आरोपींनी वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करुन दिशाभूल केली होती. याप्रकरणी गुजरात व नागपुर येथील पाच आरोपी हरी गंगाराम बावरी राठोड, सुरज व राहुल हसमुखभाई राजपूत, गौरांग चंद्रकांत पटेल आणि बबलु बिरवंद सोलंकी यांना अटक करण्यात आली.
या दोन्ही प्रकरणांतील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते मुळ फिर्यादी महिलांना सुपूर्द करण्यात आला. या कार्यवाहीबद्दल पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस हवालदार बापु मांगडे यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
या कामगिरीमुळे नागरिकांत पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण झाला असुन संबंधित फिर्यादींनी व स्थानिकांनी शिरूर पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक
शिरुर नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण व भंगार घोटाळ्यावर १५ दिवसांत खुलासा द्यायचा आदेश
रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …