रांजणगाव गणपती (तेजस फडके) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या सानिध्यात आल्यानंतर मी ‘वाल्या’ चा वाल्मिकी झाल्याचे नुकतेच विधान केले होते. ते विधान त्यांच्या चांगलंच अंगलट आल्याची सध्या शिरुर-आंबेगाव मतदार संघातील ४२ गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन देवदत्त निकम यांच्यानंतर कारेगावचे सुपुत्र अॅड संग्राम शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत पाचुंदकर यांच्यावर टिका करत रांजणगाव गणपती मध्ये जेव्हा सभा होईल तेव्हा अनेक बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे.
रांजणगाव गणपती येथे (दि १७) रोजी देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शेवाळे यांनी नाव न घेता मानसिंग पाचुंदकर यांच्यावर तोफ डागली. यावेळी शेवाळे म्हणाले, देवदत्त निकम हे शेतकरी असुन आजही त्यांचं एकत्रित कुटुंब आहे. ते स्वतः शेती करतात. असं असताना जर निकम साहेबांनी रांजणगाव सारख्या ठिकाणी शेती घेतली तर तुमच्या कशाला पोटात दुखायला पाहिजे…? तुमचं असं मत आहे कां की जमिनी फक्त तुम्हीच घेतल्या पाहिजे. जर एखाद्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने रांजणगाव सारख्या ठिकाणी जमीन घेतली तर बिघडल कुठं…? हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे.
तसेच तुम्ही दहावी कसे पास झालात…? कोणाला बसवुन पास झालात…? हे जर विचारलं आणि तुम्ही अशा पद्धतीने पास होऊन जर एक एक कोटींच्या गाड्यांमध्ये फिरत असाल तर त्या कशा आल्या…? हा माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. आमची लढाई छोटी नसुन आमची लढाई मोठी आहे. निकम साहेबांचं नावं आता राज्यात घेतलं जातंय. त्यामुळे अशा छोटया लोकांबद्दल चर्चा करण्यात आम्ही वेळ वाया घालवणार नाही.
रांजणगावच्या सभेत मोठा अनेक बॉम्ब फोडणार…
यावेळी पुढे बोलताना अॅड संग्राम शेवाळे म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रांजणगाव येथे जेव्हा प्रचारसभा होईल. त्यावेळी शिरुर-आंबेगावच्या ४२ गावातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतमध्ये घातलेल लक्ष असेल, गटातटाच राजकारण असेल किंवा रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीतुन काढलेली माथाडीची बोगस बिल असतील असे अनेक प्रकार रांजणगाव MIDC त चालतात. ज्यावेळी रांजणगाव मध्ये सभा होईल. त्यावेळी असे साठवून ठेवलेले अनेक बॉम्ब आम्ही त्यावेळेस फोडू असा इशारा यावेळी शेवाळे यांनी दिला आहे.
शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’ चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार
दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण
शिरुर; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार:- संगीता राजापूरकर
शिरुर-हवेलीत कसा जमणार सत्तेचा खेळ…? आचारसंहिता जाहीर झाली तरीही महायुतीचा अजुनही नाही मेळ
शिरुर-हवेलीतुन ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार; महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात…?
कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…
शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा…