मुख्य बातम्या

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

शिक्रापूर: भारत मातेची सेवा करून आलेल्या निमगाव म्हाळुंगी येथील सैनिकांनी जय जवान माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त विजय धोत्रे यांच्या कुटुंबियांना 65000 हजार रुपये हॉस्पिटल खर्चा साठी देऊन माणुसकीचा झरा जपला आहे.

निमगाव म्हाळुंगी येथील गरीब कुटुंबातील असणारे आणि मोलमजुरी करून पोट भरणारे विजय ज्ञानोबा धोत्रे यांच्या दोन मुलींचा अपघात निमगाव म्हाळुंगी-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर झाला होता. अपघातात दोन्ही मुली जखमी झाल्या होत्या. परंतु, त्यातील एक मुलगी गंभीर जखमी झाली असल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला होता. यावेळी जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे आणि सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण यांनी विजय धोत्रे यांना व त्यांच्या कुटुंबियांना फोन करून तुम्हाला आर्थिक मदत आम्ही सर्व माजी सैनिक करणार आहोत, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, अशा स्वरुपाचा आधार दिल्यावर धोत्रे कुटुंबियांना सर्व माजी सैनिकांचा आधार वाटला.

जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे आणि जय जवान माजी सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण आणि सर्व आजी माजी सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि निमगाव म्हाळुंगी चे आदर्श सरपंच श्री बापूसाहेब काळे यांच्या हस्ते धोत्रे कुटुंबातील विजय धोत्रे, सुरेखा धोत्रे, भावना दौंडकर यांच्या कडे शुक्रवारी (ता. १६) एकूण 65 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी धोत्रे कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद दिसत होता. धोत्रे कुटुंबातील विजय धोत्रे व त्यांच्या कुटुंबियांनी जय जवान माजी सैनिक संघटनेच्या सर्व माजी सैनिकांचे व जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे आणि सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण व निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.

निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे म्हणाले, ‘आमच्या निमगाव म्हाळुंगीतील सैनिक, भारतमातेची प्रामाणिक सेवा करून सैनिक सेवा निवृत्त झालेत. परंतु गावातील सैनिक सेवा निवृत्त होऊन सुद्धा जय जवान माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक, धार्मिक कार्य मोठया प्रमाणावर करून समाजामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य या संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र विधाटे आणि सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वा खाली घडत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि सैनिकांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या निमगाव म्हाळुंगी गावचा सरपंच म्हणून मी काम पाहत आहे.’

जय जवान माजी सैनिक संघटनेचे कौतुक केले आणि भविष्यात सुद्धा अशाच स्वरूपाचे कार्य आपल्या संघटनेच्या माध्यमातून घडत रहावो आणि आपली संघटना खूप मोठया नावारूपाला येवोत अशा स्वरूपाच्या शुभेच्छा सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी सदर निधी देतेवेळी व्यक्त केल्या. तसेच गावातील ज्या ज्या ग्रामस्थांनी विजय धोत्रे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली त्या ग्रामस्थांचे सुद्धा आभार सरपंच बापूसाहेब काळे यांनी मानले.

सदर मुलींचा अपघात घडलेल्या ठिकाणी वेळोवेळी अपघात घडत असतात मागील 2 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी दोन युवकांनी अपघातात जीव गमवावा लागला आहे तर काहीजण जखमी सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्रव्यवहार करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दखल घेतली नाही, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचा या ठिकाणी सरपंच बापूसाहेब काळे यांनी निषेध व्यक्त करून लवकरात लवकर सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी सरपंच बापूसाहेब काळे यांनी केली आहे.

यावेळी जय जवान माजी सैनिक संघटनेचे सुभेदार बाळासाहेब घोलप, हवालदार लक्ष्मण शिंदे, हवालदार मारुती चौधरी, हवालदार अंकुश काळे, हवालदार लक्ष्मण कुसाळे, हवालदार आनंदा पवार, हवालदार सुनील चव्हाण, हवालदार बाबा मराठे, हवालदार संजय पाटील तसेच मोठया प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

निमगाव म्हाळुंगी येथे दशक्रिया शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन!

निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी…

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!

निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!

निमगाव म्हाळुंगीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसीत बेकायदा पिस्तूल बाळगणारा जेरबंद; ३५ हजारांचा गावठी कट्टा जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला…

2 तास ago

सहा महिन्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’; जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा मोठा दावा, ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार निवडणुका?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.…

2 तास ago

‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त…

2 तास ago

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव…

2 तास ago

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी…

4 तास ago

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून…

4 तास ago