मुख्य बातम्या

जालन्यातील लाठीहल्याचा सणसवाडी ग्रामस्थांकडून निषेध

कोरेगाव भीमा (प्रतिनिधी) सणसवाडी (ता.शिरुर) ग्रामस्थांच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधावांवर अमानुषपणे जो काठीहल्ला करण्यात आला त्याचा जाहीर निषेध करण्यात येऊन याबाबतचे निवेदन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व ग्रामस्थांनी दिले. यावेळी सणसवाडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

गावातील सर्व ग्रामस्थ व व्यापारी यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले.यावेळी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणी,दूध, हॉस्पिटल,मेडिकल व इतर अत्यवश्यक सेवा सुरु ठेवण्यात येऊन नागरिकांची गैरसोय टाळण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत अमानुष लाठीहल्ला, अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत हवेत गोळीबार केल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला असून कोपर्डी येथील भगिनीला न्याय मिळावा,मराठा आरक्षण मिळावे व मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेन्यात यावे अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी उद्योगनगरी सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, शिरुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच संगीता हरगुडे, दगडू दरेकर, निलेश दरेकर, माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे, विजय दरेकर, विद्यादर दरेकर, ग्रामपंचायत सदस्य तनुजा दरेकर, माजी सरपंच सुरेश हरगुडे, सुभाष दरेकर, नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, पोलीस पाटील दत्ता माने, शिवाजी हरगुडे, शुभ संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे, आणि प्रा .अनिल गोटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रासह जगाने शांततेत पार पाडणारे मराठा क्रांती मोर्चे पाहिले असून जालन्यातील लाठीहल्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासंबधित आंदोलकांवर आत्तापर्यंत दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात येऊन सर्वसामान्य मराठी कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवावे’, मराठा आरक्षणाचा ‘ प्रश्न तातडीने मार्गी लावावा, कोपर्डीमध्ये ज्या भगिनीवर अत्याचार झाला तिला न्याय मिळाला नसून तिला न्याय मिळावा.

सुवर्णा रामदास दरेकर (सरपंच) सणसवाडी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

8 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

14 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

15 तास ago