शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात सणसवाडी येथे गॅसचा स्फोट; जीवितहानी नाही, घरातील सर्व साहित्य जळून खाक

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील नरके वस्तीवर रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक गॅसचा भडका होऊन राजाराम दत्तात्रय नरके यांचे घर जळाले असून नुकतेच लग्न झालेल्या मुलाचा संसारोपयोगी वस्तू व लग्नाचा बस्ता यामध्ये जळाला असून नरके कुटुंबीयांशी आमदार अशोक पवार यांनी संवाद साधत कुटुंबीयांना धीर दिला असून काळजी करु नका. काही मदत लागल्यास कळवा आम्ही तुमच्यासोबत आहोत असा आधार दिला असून शिरूर तहसीलदारांना सदर घटनेचा पंचनामा तातडीने करून नरके कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना आमदार अशोक पवार यांनी केल्या.

सणसवाडी येथील नरके वस्तीवर रात्री साडेनऊच्या सुमारास राजाराम दत्तात्रय नरके यांच्या घरी गॅसचा अचानक स्फोट झाल्याने घरातील वस्तूंना आग लागली यावेळी आगीची तीव्रता पाहून सर्व कुटुंबीय बाहेर आले पण नवीनच लग्न झाले असल्याने संसारोपयोगी वस्तू, लग्नाचा बस्ता,घरातील इतर वस्तू जळाल्याने कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या गॅसच्या स्फोटामध्ये माळवादी घर पूर्णपणे जळाले असून घराची वासे,आढे जळाल्याने कौले खाली पडली आहेत तर भिंतीही काळवंडल्या आहेत यात नवदाम्पत्याचे संसारोपयोगी साहित्य व लग्नाचा बसता जळाला असून सदर आग विझविण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला.

सदर दुर्घटनेबाबत सणसवाडी ग्रामस्थांना कळताच त्यांनी तातडीने भेट दिली. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर यांनी नरके कुटुंबीयांना आधार देत काळजी करू नका असे सांगत याबाबत तातडीने आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधून सदर घटना कळवली. यावर आमदार पवार यांनी राजाराम नरके व कुटुंबीयांशी संपर्क करत काळजी करू नका. आम्ही सोबत आहोत, सर्व कुटुंबीय व्यवस्थित आहे ना ? अशी काळजीने चौकशी करत काही लागल्यास कळवा आम्ही आहोत असे सांगत नरके कुटुंबीयांना धीर दिला.

नरके कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आवाहन

सणसवाडी येथील राजाराम दत्तात्रय नरके हे गरीब कुटुंब असून त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच असून गॅस स्फोटात घरचं जळाल्याने त्यांना मदतीची अवशक्यता असून दानशुरांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. आमदार अशोक बाप्पु पवार युवा मंच यांच्यावतीने पंडित दरेकर यांनी आकरा हजार रुपये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे यांच्याकडून अकरा हजार रुपये तर सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांच्याकडून पाच हजार रुपये, उद्योजक सलीम खान यांनी 2100 रुपये अशी मदत करण्यात आली असून मदतिचा ओघ नरके कुटुंबीयांकडे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना जी शक्य होईल ती मदत करण्याचे आवाहन पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे व सरपंच सुवर्णा दरेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

यावेळी सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, शिरुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच संगीता हरगुडे,उद्योजक रामदास दरेकर, निलेश दरेकर, ग्रामपंचायत सदस्य तनुजा दरेकर, माजी सरपंच सुरेश हरगुडे, सुभाष दरेकर, नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे आणि प्रा .अनिल गोटे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago