मुख्य बातम्या

MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न विचारून सरकारचे लक्ष याकडे वेधून घ्यावे अशी विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदनद्वारे केली आहे.

आज (दि 17) रोजी दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमानिमित्त खंडाळे (ता. शिरुर) येथे आले होते. त्यावेळी शेखर पाचुंदकर यांनी MEPL कंपनीमुळे आसपासच्या गावातील शेती नापिक होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना न्याय मिळावा तसेच सरकारने कंपनीला अधिकचे वाढिव क्षेत्र देऊ नये यासंदर्भात वळसे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही दिले. या संदर्भात याआधीच जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र दिले असून येत्या अधिवेशनात त्या संदर्भात LAQ विचारणार असल्याचेही माजी गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आश्वासन दिल्याचे पाचुंदकर यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

15 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago