मुख्य बातम्या

शिरुर; कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; सात आरोपींना २४ तासांच्या आत अटक

कारेगाव (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) हद्दीतील कारेगाव हद्दीत प्लेटोर सोसायटीच्या समोर तु आमच्या मित्राकडे खुन्नस देऊन का पाहिले असे म्हणत एका अल्पवयीन मुलासह सात जणांनी पोटात, डोक्यात, पाठीत कोयत्याने मारुन एका १७ वर्षाच्या युवकास गंभीर जखमी केले होते. रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी २४ तासांच्या आत सर्व आरोपीना अटक केली आहे.

याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २३ मार्च २०२५ रोजी रात्री ९ च्या सुमारास सौरभ श्रीराम राठोड याला गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओंकार देशमुख, ओम चव्हाण, रोहन गाडे व इतर दोन अनोळखी इसमांनी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे यांनी “तु आमचा मित्र ओंकार देशमुख याला खुन्नस देवुन का बघितले…? तुला माहित आहे का, ओंकार देशमुख कोण आहे, थांब तुला जिवंतच सोडत नाही असे म्हणत ओंकार देशमुख व रोहन बोटे याने त्याच्याकडील कोयत्याने सौरभ राठोड याच्या पोटात, डोक्यात, पाठीत कोयत्याने मारुन गंभीर जखमी केले.

तसेच इतर साथीदार आरोपींनी हाताने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन सौरभ श्रीराम राठोड (वय १७) सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे, मुळ (रा. शिवाजीनगर, ता. गंगाखेड, जि. परभणी) यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकरणी कु. यश राजु धनवटे सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ (रा. रामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर) याच्या फिर्यादीवरुन दि २४ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा घडल्याबाबत माहिती मिळताच शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलीस स्टाफसह सदर गुन्हा घडल्या ठिकाणी भेट देवुन आरोपीच्या शोध कामी पोलीस स्टेशनकडील तपास पथक, स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांना सुचना देवुन रवाना केले. तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी हे केज, जि. बीड हद्दीत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केज पोलीस स्टेशनमधील पोलीसांची मदत घेत आरोपीना ताब्यात घेतले.

रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण व तपास पथकाने केज पोलीस स्टेशन, जि. बीड येथुन आरोपीना ताब्यात घेवुन रांजणगाव पोलीस स्टेशनला हजर केले असुन सदर गुन्ह्यामध्ये १) शंकर जालिंदर करंजकर (वय १९) मुळ रा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशिव २) ओम दत्ता चव्हाण (वय १८ वर्षे,२ महिने) मुळ रा. धानोरा, ता. करंजा, जि.वाशिम, ३) रोहन रघुनाथ बोटे (वय १८ वर्षे, ४महिने) मुळ रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर. ४) ओंकार विजय देशमुख (वय १८ वर्षे, १०महिने) मुळ रा. डोनवाडा, ता. वसमत जि. हिंगोली, ५) गिरीश गोविंद क-हाळे (वय २०) वर्षे, मुळ रा. हिवरा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली, ६) गोरख विठ्ठल मोरे (वय २२), मुळ रा. कृष्णानगर, मुखेड, ता.मुखेड, जि. नांदेड, ७) हर्षल सुरेश पारवे (वय २०) वर्षे, मुळ रा. शिवानी, ता. शेणगाव, जि. हिंगोली. सर्व सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

या सर्व आरोपीना आज दि २५ मार्च २०२५ रोजी दुपारी १:३२ वा. अटक करुन त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २९ मार्च २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच सदर गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन बालकाचा समावेश असल्याने त्यास औंध (पुणे) येथुन ताब्यात घेवुन जिल्हा बाल न्यायालय, येरवडा, पुणे येथे हजर करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, प्रविण पिठले, पोलिस हवालदार विजय सरजिने, विलास आंबेकर, अभिमान कोळेकर, माऊली शिंदे, रामेश्वर आव्हाड, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार तुषार पंधारे, पोलिस हवालदार जनार्धन शेळके, संजय जाधव, यांनी तसेच केज पोलीस स्टेशन कडील पोलिस निरीक्षक वैभव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मांजरने, पोलिस निरीक्षक निकम यांनी केली आहे.सदर गुन्हयांचा पुढील तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

7 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

7 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

7 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

22 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago