शिरूर तालुका

शिरूर नगर परिषदेची थकीत कर वसुली मोहीम तीव्र

थकीत मालमत्ता धारकांची नावे मुख्य चौकात प्रदर्शित करण्याचा निर्णय

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगर परिषद घोडनदीच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसच शिल्लक असल्याने कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

नगर परिषदेच्या नियमानुसार, मालमत्ता कर व पाणीपट्टी दरवर्षी १ एप्रिल रोजी भरावा लागतो. तसेच, पहिल्या सहा महिन्यांच्या आत कर भरणे बंधनकारक आहे, अन्यथा महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १५० अ (१) नुसार थकबाकीदारांवर दरमहा २% शास्ती आकारली जाते. (दि. २५) मार्च २०२५ रोजी, नगर परिषदेच्या पथकाने मटन मार्केटमधील एका गाळ्याला सीलबंद करण्याची कारवाई मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यावेळी अक्षय बनगीनवार, दीपक कोल्हे, मोहन गुरव, तेजस शिंदे, अमृत भवर, भगवान आगोणे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, थकीत पाणीपट्टीमुळे आतापर्यंत ६८ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पुढील काळातही थकीत मालमत्तेची जप्ती तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू राहणार आहे.

थकबाकीदारांची नावे मुख्य चौकात प्रदर्शित करण्याचा इशारा

नगर परिषदेकडून नागरिकांना वेळोवेळी कर भरण्यासाठी मोबाईल संदेश पाठवण्यात आले. तसेच, डिसेंबर २०२४ पासून शहरात १० घंटा गाडीच्या माध्यमातून दवंडीही दिली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी (शनिवार, रविवार) देखील नवीन प्रशासकीय इमारतीतील नागरी सुविधा केंद्र तसेच जुन्या नगर परिषद कार्यालयात अतिरिक्त वसूली केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर, नागरिकांना घरबसल्या “Shirurnp.org” या संकेतस्थळावरून ऑनलाईन कर भरण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.

मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “थकीत कर न भरणाऱ्या मिळकत धारकांची नावे शहरातील मुख्य चौकात फलकांवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी त्वरित कर भरावा.”

नागरिकांनी वेळेत कर भरून दंड व कारवाई टाळावी

शिरूर नगर परिषदेकडून थकबाकीदारांसाठी कठोर भूमिका घेतली जात असली, तरी नागरिकांनी वेळेत कर भरून अनावश्यक कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शिरूर नगर परिषद, घोडनदी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

21 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago