आरोग्य

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही उपाय

1) काकडीचे खाप: आपल्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी काकडीचे गोल खाप महत्त्वाची भूमिका बजावतात, तसेच डोळय़ांना आरामही मिळतो. काकडीचे खाप चांगले क्लीनझर आहे. डोळ्यांखालील काळे वर्तुळे जाण्यास ते मदत करते. काकडीची गोल खाप करून दिवसातून दोन ते तीन वेळा १o मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

2) तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप: घेत नसाल, तर त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या. विश्रांती ही महत्त्वाची आहे. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन ते काळे पडणार नाहीत.

3) सकाळी चहा केल्यानंतर चहाचा (चोथा): छोटे कण फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यावर पुरुषांनी डोळ्यांखाली हलक्या हाताने चोळावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

4) टोमॅटोतील अनेक गुण: तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्यांखाली लावावे. दोन मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवून काढावे.

5) बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत: डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

1 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

5 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

5 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

5 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

5 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

5 तास ago