मुंबई: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिकदृष्ट्या कसरत/ व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत मंत्री श्री.भुसे यांनी मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.भुसे म्हणाले, या कवायतींचा कालावधी साधारतः 15 ते 20 मिनिटांचा असेल. यासाठी सर्व शाळांना नमुना मार्गदर्शक व्हिडीओ पुरविण्यात आलेला असून सध्या प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचा सामूहिक स्वरुपात कवायत संचलन सराव करून घेण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनी सामूहिक कवायत संचलन असल्यामुळे गावातील, शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी शाळेत अथवा एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रत्येक 10 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक मार्गदर्शनासाठी नेमण्यात आलेला आहे.
मंत्री श्री.भुसे म्हणाले, हा कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणात होणार असून शालेय शिक्षण आयुक्त हे या कार्यक्रमाचे सर्व व्यवस्थापन पाहत आहे. आजारी, अशक्त, दिव्यांग अशा विद्यार्थ्यांना कवायत करण्याची सक्ती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…