मुख्य बातम्या

शिरुर; मनरेगा विहिर गैरव्यवहार प्रकरणी बीडीओंनी दिला स्थळ पाहणीचा आदेश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या कामावर गंभीर शंका उपस्थित होत असून, या पार्श्वभूमीवर शिरुर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ स्थळपाहणी करुन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत मच्छिंद्र बापूराव पवार यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत सुरेश विश्वनाथ देशमुख आणि प्रदीप सुरेश देशमुख यांनी घेतलेल्या विहिरीची मंजुरी गट नं. ४७ मध्ये असून प्रत्यक्षात काम गट नं. ६१७ मध्ये केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, गट नं. ६१७ मध्ये देशमुख यांचे नाव ७/१२ व ८-अ उताऱ्यात नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर उपोषण सुरु असताना शिरुर पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी (वर्ग १) यांनी विस्तार अधिकारी बी.आर. गावडे, शाखा अभियंता रोशन तुमसरे (जि.प. बांधकाम), तसेच तांत्रिक अधिकारी राजेंद्र कोकरे (रोहयो शाखा) यांना तातडीने आज (दि ३) रोजी स्थळ पाहणी करुन मंजूर गट व प्रत्यक्ष खोदकाम झालेल्या गटाबाबत पंचनामा सादर करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, या वादग्रस्त विहिरीच्या चौकशीवेळी देशमुख यांनाही उपस्थित राहण्यास सांगितले असून, आता या स्थळ पाहणीनंतर खरे काय आणि खोटे काय हे चित्र स्पष्ट होणार आहे. गावकऱ्यांमध्ये या चौकशीबाबत मोठी चर्चा सुरु झाली असून, मनरेगा योजनेत गैरव्यवहार झाला…? की केवळ वैयक्तिक सुडासाठी हा गाजावाजा केला गेला अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

स्थळ पाहणीच्या वेळेस तक्रारदारचं गैरहजर…

आज दि ३ ऑक्टोबर २०२५ रोजी विस्तार अधिकारी बी.आर. गावडे, शाखा अभियंता रोशन तुमसरे (जि.प. बांधकाम), तसेच तांत्रिक अधिकारी राजेंद्र कोकरे (रोहयो शाखा) यांनी भांबर्डे गावातील गट क्रं ४७, ६२० आणि ६२२ यामध्ये पाहणी करुन पंचनामा अहवाल तयार केला आहे. यावेळी तक्रारदार मच्छिंद्र बापूराव पवार हे मात्र गैरहजर होते.

शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

शिरुर; मनरेगा गैरव्यवहाराचा खोटा आरोप…? देशमुखांचा पवारांवर पलटवार

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

6 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago