मुख्य बातम्या

पिंपळे जगताप कडे जाणारा रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करु; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) पिंपळे जगताप गावच्या हद्दीतील असलेला भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे पिंपळे जगतापचे ग्रामस्थ संतापले आहेत आणि या संतापातूनच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी शिक्रापुर पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय शिरुर, सार्वजनिक बांधकाम विभाग शिरुर, जिल्हाधिकारी पुणे, पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरण यांना याबाबत निवेदन दिले आहे.

 

सोमवार (दि १२) ऑगस्टला सर्व ग्रामस्थ मिळुन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण आंदोलन करणार आहे. चाकण – शिक्रापुर रोड (करंदी फाटा ) ते सणसवाडीकडे जाणारा रस्ता विशेषतः ‘भारत गॅस’ कंपनीकडे जाणारा अंदाजे दोन किमी अंतर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरुन प्रामुख्याने २५ मेट्रिक टन वजन क्षमतेपेक्षा जास्त वजनाची अवजड वाहने भारत गॅस कारखान्याची वाहतुक होत आहे. त्याचबरोबर कामगार, शेतकरी, शाळकरी मुले, व्यावसायिक या रस्त्यावरून ये-जा करत आहेत. परंतु हा रस्ता वापरण्यायोग्य राहिलेला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

 

या रस्त्यावर मोठया मोठया खड्ड्याचं साम्राज्य पसरले असल्याने वाहनचालकांना वाहतुक करताना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहेत. याबाबत यापूर्वीही ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक विभागाला ग्रामस्थांनी माहिती कळवली होती. परंतु अद्याप काहीच ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

त्याचप्रमाणे चाकण-शिक्रापुर रस्ता (करंदी फाटा) ते एल अँड टी फाटा (पुणे-नगर रस्ता) हा रस्ता देखील अल्पावधीतच खराब झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक देखील चर्चेचा विषय ठरली आहे. हा रस्ता शिक्रापूर येथील होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला दिलासा देणारा रस्ता आहे. परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या इशाऱ्याची कशा प्रकारे दखल घेणार हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे.

शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादकांनी सुक्ष्म अन्नद्रव्यांना महत्व द्यावे; जयवंत भगत

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago