शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादकांनी सुक्ष्म अन्नद्रव्यांना महत्व द्यावे; जयवंत भगत

शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेत असताना नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नघटक आपण सरळ खते जसे कि युरिया, सुपर, फॉस्फेट व पोटॅशच्या माध्यमातून तसेच मिश्र खते संयुक्त खते या माध्यमातून देत असतो. काही झिंक व फेरस या अन्नघटकाच्या कमतरतेमुळे केवडा रोग दिसुन येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऊस व्यवस्थापन करताना खत व्यवस्थापनाला अनन्य महत्व देऊन प्रथम अन्नघटक दुय्यम अन्नघटक व सुक्ष्म अन्नद्रव्ये यांचा समावेश करून खत व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले आहे.

 

दुय्यम अन्नघटक जसे कि कॅल्शिअम मॅग्नेशियम सल्फर व सुक्ष्म अन्नद्रव्ये जसे कि झिंक बोरॉन फेरस मॅगनीज मॉलिब्डेनम अशा अन्नघटकाकडे शेतकरी दुर्लक्ष करताना दिसत असल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणावर फेरस व झिंक ची कमतरता परिसरात दिसुन येत आहे. लोह व जस्त या सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे केवडा हा विकृती ऊस पिकात आढळते तसेच चुनखडीयुक्त जमिनित याचे प्रमाण जास्त दिसुन येते खोडवा ऊसात केवडा जास्त आढळतो केवडा वाढल्याने पानाचे प्रकाश संश्लेषण कार्य मंदावते परिणामी ऊसाच्या संख्येवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

 

त्यामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ऊस लागवड करतेवेळी फेरस सल्फेट १० किलो व झिंक सल्फेट १० किलो शेणखतात मिसळुन द्यावे. तसेच उभ्या पिकात आढळल्यास फेरस ५०० ग्रॅम व झिंक ५०० ग्रॅम आणि युरीया २ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून शेतकऱ्यांनी फवारणी करावी अशी सुचना कृषी सहायक भगत यांनी दिल्या आहेत.

शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वाळुंज तर उपाध्यक्षपदी विठ्ठल दुर्गे यांची बिनविरोध निवड

शिरुर तालुका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण; सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडे करोडोंची माया…?

शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?