शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर येथे गजबजलेल्या मलठण फाटा परिसरात लोकवस्तीमध्ये भरदिवसा एस एम रेसिडेन्सी सोसायटी येथे चोरट्यांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करत लिफ्टमध्ये जात असलेल्या महिलेला लक्ष करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. आजूबाजूला गर्दी असतानाही चोरटे कोणालाही न घाबरता चोरी करुन पसार झाले.
शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस महिलांच्या सोनंसाखळी चोरीचे प्रमाण वाढतं असुन शिरुर शहरातील ओयासिस सोसायटी मध्ये ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रकार घडला होता. दोन दिवसांत दोन महिला लुटल्या गेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी प्रचंड रोष आहे.
पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले असुन शिरुर तालुक्यातीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी यावर तातडीने उपाययोजना करुन आरोपींना अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच शिरुर तालुक्यात पोलीसांनी गस्त वाढविण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
Video; रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन जवळच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न
शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला
करडे येथील बाप-लेकीला अटक करण्यास पोलिसांकडुन टाळाटाळ की वरिष्ठ अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?