मुंबई: राज्यात लवकरच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकात शहरी भागात प्रभाव रचना व ग्रामीण भागात गट व गण निश्चित केले जातात. प्रभाग, गट व गण निश्चित करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
ग्रामविकास तसेच नगरविकास विभागाचे मुख्य सचिव यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे लिहितात की, प्रभाग रचना करताना या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पुरेपुर पालन होणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निश्चित करताना व त्यांच्या चतुःसीमा ठरवताना नियमामध्ये नमूद असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही व कोणत्याही राजकीय दबावाखाली चुकीचे काम होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावर राहिल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…