महाराष्ट्र

नांदणीची नंदा पोळ जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या

नांदणी: नांदणीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज भरून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या नंदा पोळ यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नोकरी मिळाली आहे. या निवडीमुळे त्या जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत.

नंदा पोळ या मूळच्या नांदणीच्या असून, त्यांच्या कुटुंबाचा फारसा राजकीय इतिहास नाही. त्यांनी प्रथम ग्रामपंचायतीत अर्ज भरला होता; मात्र, ज्येष्ठ काँग्रेस नेते कै. रत्नाप्पा कुंभार यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.त्याच वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि नांदणी गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव राहिला. कै. कुंभार यांनी पोळ कुटुंबाला अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला आणि काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नंदा पोळ विजयी ठरल्या आणि जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आली.

अध्यक्षपदाचा कालावधी जरी फक्त एक वर्षाचा होता, तरी नंदा पोळ यांनी या काळात वेतन आयोगाची तयारी, अंगणवाडीसाठी नवीन इमारती, समाज मंदिरे आणि शाळांच्या इमारतीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महिला नेतृत्व किती परिणामकारक ठरू शकते हे प्रत्यक्षातून दाखवून दिले.एक वर्षानंतर अध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेत त्यांनी पद सोडले, पण राजकारणापासून दूर राहूनही त्यांनी त्यांच्या नेतृत्वाची छाप कायम ठेवली. नंदा पोळ यांच्या निवडीमुळे राजकारणात एक पाऊल मागे घेतल्यावर पुढची संधी किती मोठी असू शकते, हे पुन्हा एकदा दिसून आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

58 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago