मुख्य बातम्या

शिरुर मतदार संघात तुतारी वाजली, घड्याळाची टिकटिक बंद…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर लोकसभा मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे. हा विजय सुकर होण्यासाठी शरद पवारांविषयी लोकांच्या मनात असलेली सहानुभुती व प्रेम हे कारणीभुत ठरले आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात ” शरद पवार पँटर्न ” चालला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण शिरुर मतदार संघात करण्यात आलेले औद्योगीकरण व शेती व पिण्याच्या पाण्यात बांधलेली मुबलक धरणे या सा-या गोष्टींचा विचार करुन मतदार राजाने शरद पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत अमोल कोल्हेंच्या पारड्यात 6 लाख 98 हजार 307 मतांच दान दिल आहे.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5 लाख 57 हजार 489 मतांवर समाधान मानावे लागले आहे. मतमोजणीला सकाळी सातच्या सुमारास सुरवात झाल्यावर सुरवातीला मतमोजणी केंद्राजवळ शासकीय कर्मचारी व पोलीस वगळता कोणीही दिसुन येत नव्हते. माञ जसजसा दिवस ढकलु लागला व मतमोजणीच्या फेऱ्या वाढू लागल्या तसतसे डाँ अमोल कोल्हे यांचे समर्थक मतमोजणी केंद्राजवळ व परिसरात गर्दी करु लागले होते. दुपार च्या सुमारास डॉ. अमोल कोल्हे यांचे रांजणगावला आगमण झाले तेथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर कोल्हे मोजणी केंद्राजवळ आले असता तेथे ही उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेऊन मोजणीकेंद्रापर्यत भव्य अशी मिरवणुक काढली. या मिरवणूकीत सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात विशेषतः जुन्नर तालुक्यातील अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा मतदार संघातील मतदारांनी ” तुतारी ” वाजवत डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा खासदारकी बहाल करुन दिल्लीला रवाना केले आहे.

 

शिरुर लोकसभेच्या रणांगणात आजी माजी खासदारांमध्ये झालेल्या लढतीमध्ये खासदार अमोल कोल्हे पहिल्या पासुनच आघाडी घेतल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. व माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

शिरुर लोकसभा मतदार संघातील फेरीनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
पहिली फेरी ६००० मतांची आघाडी ,
दुसरी फेरी ९५५३
तिसरी फेरी १११११ ,
चौथी फेरी १८६७४ ,
पाचवी फेरी २५०८८ ,
सहावी फेरी २७०३३ ,
सातवी फेरी ३३१९४ ,
आठवी फेरी ३६८१५ ,
नववी फेरी ४४०६८ ,
दहावी फेरी ४९७७० ,
आकरावी फेरी ५३९४९ ,
बारावी फेरी ५२५४२ ,
तेरावी फेरी ५५९४१ ,
चौदावी फेरी ६५०२५ ,
पंधरावी फेरी ७२५२५ ,
सोळावी फेरी ७१९८२ ,
सतरावी फेरी ७६५८३ ,
आठरावी फेरी ८३०९३ ,
एकोणीसावी फेरी ९२६४९ ,
विसावी फेरी १०४८७५ ,
एकविसावी फेरी ११४८५५ ,
बाविसावी फेरी १२०१९४ ,
तेविसावी फेरी १२६६५८ ,
चोविसावी फेरी १३३७६७ ,
पंचविसावी फेरी २३६००५ ,
सहविसावी फेरी १३७४३६
सत्ताविसावी फेरी १३९११६ ,
अंतिम फेरीत १४०८१८ मतांची आघाडी घेत खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धोबीपछाड देत पराभव केला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.अमोल कोल्हे विजयी…

शिरूर लोकसभा निवडणूकीत अमोल कोल्हे विजयाच्या उंबरठ्यावर; पाहा मतं…

अजित पवार म्हणाले, कसा निवडून येतो बघतोच; अमोल कोल्हे म्हणाले…

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

39 मिनिटे ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

43 मिनिटे ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

51 मिनिटे ago

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य…

1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…

54 मिनिटे ago

राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा…

57 मिनिटे ago

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये…

1 तास ago