मुख्य बातम्या

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील दोन सराईत आरोपींना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत शिताफीने अटक केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 18 जून रोजी सायंकाळी  सुमारास निमोणे गावाच्या हद्दीतील घोडनदीच्या पात्रात फिर्यादी दत्तात्रय नानासो काळे यांनी शेतासाठी पाणी अडविण्याच्या उद्देशाने बांध घातला होता. मात्र संकेत ज्ञानदेव काळे, शुभम ज्ञानदेव काळे आणि समीर प्रकाश शेलार यांनी मोटारसायकलवर येऊन तो बांध फोडल्याचा आरोप आहे.

याबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ अक्षय काळे आरोपींकडे गेले असता वाद चिघळला. यावेळी संकेत काळे आणि शुभम काळे यांनी दत्तात्रय व अक्षय काळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत डोके, तोंड, छाती व पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर समीर शेलार यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर आरोपी गावातून मोटारसायकलवर फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचेही समोर आले आहे. “आम्ही जेलमध्ये राहून आलो आहोत, आम्ही कोणालाही घाबरत नाही, आमच्या नादाला लागणाऱ्याची गय करणार नाही,” अशा शब्दांत आरोपींनी गावकऱ्यांना धमकावल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.

दोन तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या…
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु केली. दरम्यान, आरोपी गोलेगाव-करडे रोड परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने कारवाई करत संकेत ज्ञानदेव काळे (वय 26) आणि समीर प्रकाश शेलार (वय 23) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींवर आधीच 12 गंभीर गुन्हे…
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्यावर यापुर्वी दरोडा, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, गंभीर मारहाण, जखमी करणे यांसारख्या गंभीर स्वरुपाचे एकूण 12 दखलपात्र गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, अंबादास थोरे, नीरज पिसाळ, निखील रावडे, सचिन भोई, रविंद्र काळे, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांनी केली आहे.

गुनाटमधील वाळूच्या Video मुळे प्रशासनाची धावपळ; पंचनामा झाला, पण गुन्हा दाखल होणार का…?

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; वाळू माफिया दिवसाढवळ्या घोड धरणाचे लचके तोडत असताना पुणे आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…

19 तास ago

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

2 दिवस ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

2 दिवस ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

2 दिवस ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

2 दिवस ago