महाराष्ट्र

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि Google for Education⁠ यांच्यात उद्देशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पुढील दीड वर्षांत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी करारावर स्वाक्षरी केली.

या उपक्रमाद्वारे शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साधनांचा वापर, डिजिटल सुरक्षितता आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रारंभी निवडक मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर हे प्रशिक्षित शिक्षक राज्यभरातील इतर शिक्षकांना मार्गदर्शन करतील.

यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत एआय आधारित शिक्षणाचा लाभ पोहोचेल. विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून प्रशिक्षण गुगलकडून विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, या सहकार्यामुळे शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही होईल.

या उपक्रमांतर्गत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रशिक्षण सामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख, आधुनिक एआय साधनांचा शैक्षणिक वापर आणि व्यावसायिक विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे राज्यातील डिजिटल शिक्षण व्यवस्थेला चालना मिळणार असून स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल ग्रंथालये, आयसीटी प्रयोगशाळा आणि कनेक्टेड क्लासरूम्स अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

11 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

14 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

16 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago