Shirur Police Station
शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चार्ज घेताच शिरूर शहरातील रोड रोमिओ व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलिस वाहतुक शाखेमार्फत वीस दिवसातच तब्बल ४ लाख ५१ हजारांचा दंड वसुल केला आहे. यात १७ बुलेटस्वारांवर सायलेन्सर (फटाके फोडणे) कारवाई केली असून १७ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे. तसेच ट्रिपल सीट असणाऱ्या ७६ वाहन चालकांवर कारवाई करून ७६ हजार यांचा दंड वसूल केला आहे. विना लायसन्स गाडी चालवणाऱ्या १६ जणांवर कारवाई करून ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या 186 जणांवर कारवाई करून १लाख ४९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शिरूर शहरात फोर व्हीलर गाडीला काळा काचा लावून फिरणाऱ्या २९ जणांवर कारवाई करून २९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच फॅन्सी नंबर वापरणाऱ्या ९७ जणांवर कारवाई करून ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शिरूर शहरात नो पार्किंग मध्ये गाड्या पार्क केलेल्या १९० वाहनावर कारवाई करून तब्बल १ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी ‘पहिले जनसुनवाई मगच कारवाई’ अशी आपल्या कामाची पद्धत असल्याचे सांगितले. शिरुर शहरातील वाहतुकीचे प्रश्न, विनापरवाना वाहन चालविणे, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, रोडरोमिओ याबाबत प्रथम जनजागृतीवर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधनातून सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा दंडुका उगारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुली, महिलांची छेडखानी करणाऱ्यांची नुसती माहिती मिळाली तरी दुसऱ्या मिनिटाला त्याच्यावर कारवाई झालेली असेल. छेडछाडीचे प्रकार कुठे घडत असतील तर फक्त पोलिसांपर्यंत माहिती कळवा, त्याचा बंदोबस्त झालेला दिसेल. शाळा महाविद्यालयांच्या परिसरात दामिनी पथक, निर्भया पथकाबरोबरच नव्याने छेडछाडविरोधी पथक कार्यान्वित करीत असल्याचे केंजळे यांनी सांगितले.
दरम्यान, शिरूर शहरातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून, यापुढेही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे.
शिरूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई…
शिरूर पोलिसांकडून रोडरोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई…
शिरुर; कोर्टातली केस मागे घे म्हणतं तडीपार गुंडाची भावकीतील एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण…
शिरूर शहरात कत्तल केलेल्या चार गोमांस विक्री दुकानांवर पोलिसांची कारवाई…
पुणे-अहमदनगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…
शिरूरमध्ये तुला लय माज आला आहे काय? असे म्हणाला अन्…
शिरूर तालुक्यात कंपनीच्या मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…