कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे जुन्या तक्रारीचा राग व जमीनी मध्ये रस्ता मागण्यासाठी केलेला अर्ज या कारणावरुन चिडुन जाऊन वडीलांच्या सांगण्यावरुन एका तडीपार गुंडाने स्वतःच्या भावकीतील एका व्यक्तीस हाताने तसेच लाथा, बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करत जखमी करुन घरात घुसून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी नामदेव कांतीलाल भोरडे (वय ४०वर्ष, रा. निमगाव म्हाळुंगी ता.शिरुर जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरुन बाळू दादाभाऊ भोरडे आणि दादाभाऊ भाऊसाहेब भोरडे (दोघेही रा.निमगाव म्हाळुंगी ता.शिरुर जि.पुणे) या दोघांवर शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २१ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी नामदेव कांतीलाल भोरडे हे जमीन गट क्रं ८६८ मध्ये मेंढ्या चारत असताना त्या ठिकाणी बाळु दादाभाऊ भोरडे हा आला. त्यावेळी त्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्याने फिर्यादी यांना अडवत म्हणाला की सन २०१७ मध्ये “माझ्या वडिलांविरुद्ध तु कोर्टात टाकलेली केस काढुन घे तसेच तु जमीन गट नंबर ८६८ मध्ये रस्ता मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयात तु व तुझी आई व मामा यांनी जाऊन अर्ज का केला…? आणि जमीन गट नंबर ८६८ मध्ये मारुती पठारे यांची असलेली जमीन तु करायची नाही.” असे म्हणाला.
त्यावेळी त्याला त्याचे वडील दादाभाऊ भोरडे याचा फोन आला यावेळी बाळू भोरडे हा स्पीकरवर बोलत असताना दादाभाऊ भोरडे हा फोनवर बाळुला म्हणाला की, “त्याला सोडू नको” त्यानंतर बाळू याने फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन खाली पाडले व त्याच्याकडील लोखंडी रॉडने उजव्या हाताच्या खांद्यावर मारहाण केली आणि त्या ठिकाणाहुन निघुन जाताना फिर्यादीस म्हणाला की मी तडीपार होतो. त्यामुळे जर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेला तर घरात घुसून हातपाय तोडीन अशी धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी नामदेव कांतीलाल भोरडे यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशनला वरील दोघा बाप-लेका विरुद्ध फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच दोन्ही तडीपार आरोपी फरार झाले आहेत. तर फिर्यादी हे सध्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल नलगे हे करत आहेत.
दोन्ही बाप-लेक गुन्हेगार प्रवृत्तीचे…?
निमगाव म्हाळुंगी येथील बाळू दादाभाऊ भोरडे आणि दादाभाऊ भाऊसाहेब भोरडे या दोन्ही बाप-लेकांना त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे यापुर्वी पुणे जिल्ह्यातुन तडीपार करण्यात आले होते. परंतु तरीसुद्धा दिवसेंदिवस त्यांचा गुन्हेगारीचा आलेख वाढतच चाललेला आहे. त्यामुळे शिक्रापुर पोलिस या सराईत गुन्हेगारांना अटक करणार की त्यांना अटकपुर्व जामीनासाठी वेळ देणार याबाबत निमगाव म्हाळुंगी सह शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
शिरूर शहरात कत्तल केलेल्या चार गोमांस विक्री दुकानांवर पोलिसांची कारवाई
शिरूरमध्ये तुला लय माज आला आहे काय? असे म्हणाला अन्
शिरूर तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस जळाला