मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी विरोधातील कथित गैरप्रकारांची माहिती उघड करण्याची धमकी देत तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विजय अनिरुध्द साबळे, रा. फ्लॅट नं. १०९, मैत्री गोल्ड सोसा., शिक्रापुर, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. आंभोळ, जांभुळदरा, ता. अकोले, जि. आहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरुन अ‍ॅड. मयुर देवराम नरवडे याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी येथील मुरली कृष्णा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मिती कंपनीच्या विविध ई-मेल आयडींवर १ आणि २ जून रोजी काही गंभीर आरोप करणारे ई-मेल पाठविण्यात आले होते. कंपनीची औषधे निकृष्ट दर्जाची असल्याचा, कोल्ड स्टोरेज आणि प्रोसेसिंग विभागात तापमानाचे निकष पाळले जात नसल्याचा, कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचा तसेच गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेत अनियमितता असल्याचा दावा त्या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते, असेही नमूद करण्यात आले होते.

सदर ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर (HR) विजय साबळे यांनी संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख मयुर नरवडे अशी करुन दिली. त्यानंतर गणेगाव रोडवरील कार्यालयात झालेल्या भेटीत कंपनीच्या कथित गैरप्रकारांबाबत पुरावे असल्याचा दावा करत कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी थेट चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर शिरूर येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत खरा धक्कादायक प्रकार उघड झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

बैठकीदरम्यान कंपनीच्या वार्षिक उलाढालीच्या पाच टक्के म्हणजेच सुमारे ७.५ कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ती मागणी अवास्तव असल्याचे सांगितल्यानंतर तडजोडीअंती २५ लाख रुपये देण्याची अट घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हि “रक्कम दिली नाही तर कंपनीतील कथित गैरप्रकारांचे पुरावे संबंधित शासकीय यंत्रणांकडे देऊन कारवाई घडवून आणू,” अशी धमकीही देण्यात आली. याशिवाय व्हॉट्सअप कॉलद्वारे “आता माझ्या हातातून बाण सुटला आहे” अशा शब्दांत दबाव टाकल्याचाही आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, या संपुर्ण घटनाक्रमाचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केल्याचा दावा करण्यात आला असून ते पुरावे पोलिसांकडे पेन ड्राइव्हद्वारे सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे रांजणगाव एमआयडीसीसह (Ranjangaon MIDC) औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. रांजणगाव MIDC पोलीसांनी फिर्याद नोंदवून तपास सुरु केला असून खंडणी, धमकी आणि संबंधित इतर कलमांनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

रांजणगाव MIDC मध्ये माथाडीच्या नावाखाली खंडणी घेतल्याने तीन जणांवर गुन्हे दाखल

रांजणगाव MIDC मध्ये खंडणीची मागणी करत केली मारहाण अन् पुढे…

कारेगाव येथील आठवडे बाजारात शेतकऱ्यांकडुन जबरदस्तीने पैसे वसुली; खंडणीचा गुन्हा दाखल

माथाडीच्या नावाखाली “खंडणी” वसुल करणारा खरा सूत्रधार अजुनही मोकाट…?

सिंघमगिरी; रांजणगाव MIDC पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचत चार अपहरण झालेल्या कामगारांची केली सुटका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago