महाराष्ट्र

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासह रखडलेल्या विकासकामांना गती देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेना कुर्ला विधानसभा आयोजित ‘कुर्ला फेस्टिव्हल २०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक करताना, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा कुर्ला फेस्टिव्हल अल्पावधीत लोकप्रिय झाल्याचे सांगितले.

लोकप्रिय आमदार मंगेश कुडाळकर यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून कुर्ला फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. जय मंगेश कुडाळकर, विनोद कांबळे, शालिनीताई सुर्वे, उज्वला शहा, राजा चौगुले, उपनेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाताई शिंदे, सगुन नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सलग २४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करूनही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम राहणे ही मोठी बाब असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, कुर्ला फेस्टिव्हल अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. सर्व स्तरातील नागरिक या महोत्सवाचा आनंद घेत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्थानिक कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ येथे उपलब्ध झाले आहे. अशा महोत्सवांमधूनच उद्याचे चांगले कलाकार घडत असतात.या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बचत गटांचे स्टॉलही उभारण्यात आले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांना आधार देणारी योजना असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील कष्टकरी, शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे हे सरकार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

यावेळी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, न बोलता काम करणारे नेतृत्व आजच्या काळात दुर्मिळ आहे. कुडाळकर यांनी मतदारसंघात विविध विकासकामे आणली असून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. म्हणूनच मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना विधानसभेत पाठविले आहे.

मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात नागरिकांना विरंगुळ्याचे आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. कुर्ला फेस्टिव्हल त्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम हा महोत्सव करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

नेहरूनगर, कुर्ला पूर्व येथील पोलीस वसाहतीतील १९ इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून सुमारे ५८० कुटुंबे तेथे वास्तव्यास आहेत. या वसाहतीचा म्हाडामार्फत पुनर्विकास करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता रात्रंदिवस काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यास शासन प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री असताना पोलिसांना घरे देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासन कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनातील सर्वजण टीमवर्कच्या माध्यमातून विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.नेहरूनगर आणि टिळकनगर परिसरातील मलनिस्सारण वाहिनी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला तरी दुसरा टप्पा रखडला असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात तातडीने महापालिका आणि म्हाडा अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम सुरू करण्याचे निर्देश देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मतदारसंघातील लोकहिताचे, सर्वसामान्यांना दिलासा देणारे आणि विकासाला चालना देणारे कोणतेही प्रकल्प निधीअभावी थांबणार नाहीत, अशी ठाम ग्वाही देताना शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, क्लस्टर योजना, एसआरए योजना तसेच अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.कुर्ला फेस्टिव्हलच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत त्यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

9 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago