ranjangaon midc crime

रांजणगाव MIDC मध्ये खंडणीची मागणी करत केली मारहाण अन् पुढे…

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC येथील येथील कंपनीत असलेल्या लेबर काँन्ट्रँक्टच्या बदल्यात खंडणी दे नाहीतर लेबर काँन्ट्रँक्ट बंद कर असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत चारचाकी गाडीची काच फोडली. याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. लेबर काँन्ट्रँक्टर दिलीप कांतीलाल थेऊरकर यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १८) सकाळी 11च्या सुमारास रांजणगाव MIDC मधील “क्लासिक ट्युब” (अपोलो टायर्स) कंपनीच्या गेटजवळून दिलीप थेऊरकर हे त्यांच्या एस क्राँस गाडी क्र. MH 12 NU 8282 मधून जात होते. दत्तात्रय गायकवाड (रा. मलठण, ता. शिरुर, जि.पुणे) हा त्याच्या तिन मित्रांसह एका पांढरे रंगाच्या इनोव्हा गाडी क्र. MH 12 TD 6971 मधून आला आणि फिर्यादीच्या गाडीसमोर त्याची गाडी आडवी मारुन त्यांना थांबविण्यास भाग पाडले. तसेच “तुझे रांजणगाव MIDC मधील 3M “कंपनीतील लेबर काँन्ट्रँक्ट बंद कर, नाहीतर आम्हाला दर महिन्याला 25,000 रुपये खंडणी दे” असे म्हणून फिर्यादीच्या गाडीची काच बुक्की मारुन फोडली.

फिर्यादीला मोटारीमधून खाली ओढून हाताने-लाथाबुक्यांनी मारहाण करुन दगडाने व लोखंडी राँडने मारहाण केली. धमकी देत त्यांच्याकडील इनोव्हा गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून नेले. तसेच इनोव्हा मधून जबरदस्तीने घेवून जातांना त्यांनी गाडीमध्ये फिर्यादीला परत हाताने मारहाण करुत दत्ता गायकवाड याने फिर्यादीला “तु काँन्ट्रँक्ट बंद कर, नाहीतर दर महिन्याला 25,000 रुपये दे, तु मला अजून ओळखले नाही” असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय, फिर्यादी कडून 50,000 रुपयांची रोख खंडणी घेतली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या दिलीप कांतीलाल थेऊरकर यांनी थेट रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात धाव घेत दत्तात्रय गायकवाड आणि त्याच्या सोबतच्या सोबत असलेल्या इतर तीन अनोळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक बलवंत मांडगे हे करत आहेत.