मुख्य बातम्या

Video: कारेगाव येथे पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर तळीरामांचा अड्डा…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे यश इन चौक परिसरात उघडपणे दारू पिणाऱ्यांची वर्दळ वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर DYSP कार्यालय आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन असूनही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचे प्रकार सुरूच असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यश इन चौक हा सध्या तळीरामांचा अड्डा बनला आहे. दिवसभर तसेच सायंकाळच्या सुमारास अनेक जण रस्त्याच्या कडेला, चौकात किंवा सार्वजनिक ठिकाणी बसून दारू पिताना दिसतात. त्यामुळे परिसरातील महिलांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा दारूच्या नशेतून भांडणे, आरडाओरडा आणि शिवीगाळ होऊन वातावरण बिघडते. शिवाय, अनेकदा मोबाईल हिसकावण्याचे प्रकार घडले आहेत.

रांजणगाव एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर महिला कामासाठी ये-जा करतात. दारू पिणाऱ्यांच्या गर्दीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “DYSP कार्यालय पोलिस स्टेशन एवढ्या जवळ असताना उघडपणे दारू पिणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी परिसरातील काही गावांमध्ये ड्रग्ज आढळून आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, या प्रकरणातही ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत आहे. स्थानिक नागरिक पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष ठेवून असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, कारेगाव व रांजणगाव एमआयडीसी परिसरात गस्त वाढवून बेकायदेशीर दारूसेवन आणि अमली पदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. पोलिस प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रांजणगाव एमआयडीसीत केबल चोरट्यांचा पर्दाफाश; ४ जणांना अटक, तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

रांजणगाव MIDC परिसरात बेकायदेशीर दारू वाहतुकीचा पर्दाफाश; दोन तरुणांना अटक 

Video : रांजणगावमध्ये नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक; ६० तरुणांची सुटका, दोघे ताब्यात

रांजणगावात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, २०३ किलो ‘बंटा’ गोळ्यांसह तरुण ताब्यात

रांजणगाव MIDC मधील ITC च्या चमडिया गोडाऊनमधील लाखोंची चोरी उघड; ७२ तासांत आरोपीला अटक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

3 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

17 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

17 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

17 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

17 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

17 तास ago