महाराष्ट्र

सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच; जयंत पाटील मैदानात, रोहित पाटील यांचा ठाम शब्द

सातारा: साताऱ्यानंतर आता सांगली जिल्हा परिषद (Sangli Zilla Parishad) मध्येही सत्तास्थापनेचा पेच कायम असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने सांगलीत पक्षाचे नेते, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांनी ठाम भूमिका घेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “साहेब, तुम्ही करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहात. सांगलीतही तो करून दाखवाल. तुमच्या शब्दाच्या पुढे आमच्या मतदारसंघातील एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही,” असा शब्द रोहित पाटील यांनी दिला. झेडपीतील सत्तास्थापनेत जयंतरावांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

जागावाटपाचे गणित काय?

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने सर्वाधिक १८ जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या ११ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा १ सदस्य अशा एकूण ३० जागा महाविकास आघाडीच्या खात्यात आहेत.

दुसरीकडे, भाजपने १६ जागा जिंकल्या असून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६, शिंदेसेनेच्या ७ तसेच रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षाच्या प्रत्येकी १ जागा अशा एकूण ३१ जागा महायुतीकडे आहेत.कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. विशेष म्हणजे भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना यांची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.

“सरकार स्थापन करू, ज्योतिषाची गरज नाही”

बैठकीत रोहित पाटील यांनी जयंत पाटील यांना पुढाकार घेण्याचे आवाहन करताना म्हटले, “तुमच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. सांगली जिल्हा परिषदेत आपण सरकार स्थापन करू, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. गणित घालण्यात आणि करेक्ट कार्यक्रम करण्यात तुम्ही पारंगत आहात.”दरम्यान, सांगली जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या राजकीय घडामोडींवरच सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago