रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत दुबईतील नामांकित कंपनी आली असुन त्या कंपनीत नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर करत प्रत्येकी १० हजार रुपये उकळत तब्बल ६० तरुणांना डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या फसवणूक झालेल्यांमध्ये ४३ तरुण व १७ तरुणी असून, या सर्वांना रांजणगाव गणपती येथील ‘सुखकर्ता लॉन्स’ येथे बंदिस्त करुन ठेवण्यात आले होते. संशयास्पद परिस्थितीत अडकलेल्या या तरुणांनी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करत पोलिस प्रशासनाला माहिती दिली.
View this post on Instagram
त्यानंतर झालेल्या कारवाईत ६० तरुणांची सुखरुप सुटका करण्यात आली. या प्रकरणी कलिम अवद बिनबाद आणि ज्ञानेश्वर धायदडक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या माध्यमातुन आणखी किती तरुणांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरुन नोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडविण्याचे प्रकार वाढत असून, बेरोजगार तरुणांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी व कठोर कायदेशीर कारवाई सुरु आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…
रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक