मुख्य बातम्या

गॅसचा काळाबाजार करणारी एजन्सी जोमात अन् प्रशासन कोमात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): काळाबाजार करणारी गब्बर एजन्सी जोमात अन् आर्थिक तडजोडीने प्रशासन कोमात अशी परिस्थितीत सध्या शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

घरगुती गॅसधारकाच्या नावे ऑनलाईन दुगड एच.पी. एजन्सीकडून बुकींग दाखवून दिवसाला हजारो गॅस टाक्या काळया बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे घरगुती गॅसधारकाला गॅस टाकी वेळेवर उपलब्ध होत नाही. काळया बाजारात घरगुती गॅसची विक्री मोठया प्रमाणात होत असल्याने सदर एजन्सी व रिफिलींग करणारे चांगलेच गब्बर बनले असून, त्यांच्या आर्थिक ताकतीच्या जोरावर कारवाई करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याची चर्चा शिरूर शहरासह तालुक्यात रंगली आहे.

प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन रिफिलींगची दुकाने शिरुर तालुक्यात थाटात सुरू असून, कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभारणार असल्याचे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे यांनी सांगितले. जिल्हयासह शिरूर तालुक्यात या एजन्सीधारकांनी सब डिलरच्या नावाखाली गल्ली-गल्लीत, गावा-गावात ढिगभर सब एजन्स्या दिल्या आहेत. यांना दिवसाला फक्त ७ टाक्या देण्याऐवजी काळाबाजार करून बुकींग नसताना दिवसाला शेकडो टाक्या वितरित केल्या आहेत. भरवस्तीत, गर्दीच्या ठिकाणी ही दुकाने थाटली असून, ७ टाक्यांऐवजी शेकडो टाक्या ठेवल्याने नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे.

शिरूरमधील ‘त्या’ बडया एच.पी गॅसवर कधी होणार कारवाई?

शिरूर तालुक्यात अवैधरीत्या गॅस रिफिलींगचा व्यवसाय जोरात सुरू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

8 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago