Siddesh Shelar
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे जुन्या वादातून एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिद्धेश संजय शेलार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे विकी खराडे सह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विकी खराडे व सिद्धेश शेलार या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्या वादाचा राग विकीच्या डोक्यात असल्याने त्याने त्याच्या दोन साथीदारांना सोबत घेऊन सिद्धेश शेलार हा सोमवारी रात्रीच्या सुमारास घरी जात असताना त्याला अडवून कोयत्याच्या सहाय्याने त्याच्या डोक्यावर, हातावर गंभीर वार केले. दरम्यान, सिद्धेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके, वैभव पवार, नितीन अतकरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलिस हवालदार शंकर साळुंके, संदीप कारंडे, पोलिस नाईक श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, अशोक केदार, लखन शिरसकर, निखील रावडे, किशोर शिवणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी जखमी सिद्धेश शेलार यास रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी सिद्धेश संजय शेलार (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चर्मकार गल्ली पारनेर ता. पारनेर जि. अहमदनगर) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. शिक्रापुरात खुनाचा प्रकार घडताच शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी घटनास्थळाला भेट देत पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. घडलेल्या घटनेबाबत भूषण उत्तम शेलार (वय २८ वर्षे रा. चर्मकार गल्ली पारनेर ता. पारनेर जि. अहमदनगर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी विकी खऱाडे याच्या सह त्याचे दोन अनोळखी साथीदार (पूर्ण नाव पत्ते माहित नाही) यांच्या विरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहेत.
खुनानंतर सोशल मीडियावर धमकीचा व्हिडीओ…
शिक्रापूर येथे खून करणारा विकी खराडे याने खुनाच्या घटनेनंतर त्याच कोयत्याचा स्वतः सोबत व्हिडीओ टाकत आता तरी केला फक्त वार पुन्हा कोण नादाला लागला तर आता करेल गोळीबार असा धमकीवजा व्हिडीओ प्रसारित केला आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…