Shikrapur Police Station
शिरूर (अरुणकुमार मोटे): निमोणे (ता. शिरूर) येथील संदीप जिजाबा ताठे या जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तीला त्याच गावातील समीर प्रकाश शेलार याने त्याच्यावर पाळत ठेवून एका महिलेला व इतर तीघांना पुढे करून संदीप जिजाबा ताठे याचे सणसवाडी (ता. शिरुर) पुणे-नगर महामार्गावरुन कारमध्ये बसवून अपहरण करुन केले.
अपहरणानंतर महिलेसोबत फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करुन सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम तसेच नातेवाईकांकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे मागवून घेऊन ४ लाख ७० हजार रुपयांची लुट केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी
१) राहुल सुखदेव गायकवाड (वय ३४, रा. कोकडी ता. पारनेर जि. अहमदनगर
२) विकास प्रकाश थिटे (वय २६, रा. चौधरी वस्ती पाबळ ता. शिरुर जि. पुणे
३) अर्चना अविनाश पठारे (वय ३४, रा. जवळा ता. पारनेर जि. अहमदनगर,
४ )समिर प्रकाश शेलार (वय २१, रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलिसांनी तपास करून त्यांना शिताफीने गजाआड केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमोणे (ता. शिरुर) येथील संदीप ताठे यांना ८ सप्टेंबर रोजी अर्चना पठारे या महिलेने फोन करुन तुम्ही पैशाची मदत करु शकता का? असे विचारले त्यावेळी ताठे यांनी माझ्याकडे पैसे नाही सांगत फोन कट केला. त्यांनतर दोन दिवसांनी महिलेने दोन दिवसांनी फोन करुन माझे वाघोलीत घर आहे ते घ्या मला पाच लाख द्या असे म्हणून वारंवार फोन करण्यास सुरुवात केली. ताठे महिलेचा फोन टाळू लागले, त्यांनतर ११ सप्टेंबर रोजी ताठे पुण्याला जाणार असताना अर्चना यांनी फोन करुन सणसवाडी येथील एल एन टी फाट्या जवळ असल्याचे सांगून ताठे यांना बोलावले. यावेळी ताठे त्यांच्या कार मधून गेले असताना अर्चना यांच्यासह राहुल गायकवाड, विकास थिटे हे कार जवळ आले. त्यांनी संदीप यांना कारमध्ये बसवून वाघोली येथील एका ठिकाणी घेऊन जाऊन अर्चना पठारे सोबत संदीप ताठे यांचे फोटो काढून घेत फोटो व्हायरल करण्याची तसेच तुझ्यावर गुन्हा दाखल करुन तुला गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली.
मारहाण करत संदीप यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, अंगठ्या तसेच रोख रक्कम काढून घेतली, त्यांनतर संदीप यांच्या क्रेडीट कार्डचा पिन घेऊन त्यातून पैसे काढले. तसेच संदीप यांच्या नातेवाइकांना फोन करुन ऑनलाईन पैसे मागवून घेऊन संदीप यांची तब्बल चार लाख सत्तर हजार रुपयांची लुट करत पुन्हा सणसवाडी येथे आणून सोडून देत पोलिसांत गेला तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली.
याबाबत संदीप ताठे यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने वरील महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा करत असताना पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी तीनही आरोपींना अटक केली. मात्र, याबाबत तपास करत असताना निमोणे गावातील समीर शेलार यानेच आपल्या गावातील संदीप ताठे याच्याकडे पैसे व सोने असल्याचे सांगून लुटण्यास सांगितल्याचे समोर आल्याने पोलिसांनी समिर प्रकाश शेलार (वय २१ रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे) याला देखील अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहेत.
संदीप जिजाबा ताठे हे शेतकरी असून खरेदी विक्री व्यवसाय करतात. याच्याकडे रोख ५० हजार रुपये, त्याच्या आय डी एफ सी बँकेतून ९ हजार रुपये, ऑनलाईन फिर्यादीच्या दाजी कडून ३५, हजार रुपये, बहिणीकडून १५ हजार, मावस भाऊ यांच्याकडून ४० हजार रुपये, सोन्याची चार तोळे चैन, १ लाख ६० हजार रूपये, हातातील चार तोळ्यांच्या अंगठ्या १ लाख ६० हजार रुपये असे एकूण ४ लाख ६९हजाराचा ऐवज अपहरण करून लुटला आहे.
शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महीलेस शिवीगाळ, मारहाण करुन पार्लर जाळुन टाकण्याची दिली धमकी…
शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली….
शिक्रापूरमध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वेश्याव्यवसाय; ५ ताब्यात…
शिरूर तालुक्यात पेट्रोल पंपाचे पैसे घेऊन कामगार झाला फरार…
पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकपदी पुन्हा पंकज देशमुख कॅटच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहणार
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…