मुख्य बातम्या

शिरूर शहर बंदला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरुर शहरात सर्वात जुन्या असलेल्या राम मंदीरात सोमवारी (ता. २) मांसाहाराचे तुकडे आढळल्याचे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ आज (मंगळवार) शिरूर शहर बंद ठेवण्याचे आव्हान शिरुर शहरातील हिंदु संघटनांनी केले होते. त्यास शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन शहर बंदला नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज दुपारनंतर आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार अशोक पवार व पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर ट्रस्टी व सकल हिंदू समाजातील नागरिकांच्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शिरूर शहरात अनेक वर्षे जुने राम मंदिर आहे. राम मंदिरांचे बांधकामही अनेक दिवसापासून रखडले हे बांधकामही व्हावे अशी मागणी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, लहुजी शक्ती सेना व हिंदू धर्मांच्या नागरिकांनी केली.

शिरुर शहरातील प्रसिध्द असलेल्या राम मंदीराच्या आवारात अज्ञात व्यक्तींनी चिकन आणि मटन पार्टी केल्याचे आढळले आहे. या मुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या असून श्रीराम मंदिर राम आळी या मंदिरात कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने व मंदिराची दुरवस्था असल्याने हा प्रकार घडला. या गोष्टीला श्रीराम मंदिर ट्रस्ट जबाबदार आहे. तरी संबधीत मंदिरात मांसाहार करणाऱ्यांवर तसेच मंदिराची व्यवस्थीत देखभाल न करणाऱ्या ट्रस्टीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात शहरात हिंदू धर्म नागरिक व संघटनांचे कार्यकर्ते जमू लागले होते. त्यामुळे शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी या संघटनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आपले व्यवहार बंद ठेवून आजच्या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार अशोक पवार, शिरूर उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे, घोडगंगाची संचालक दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, आबासाहेब सरोदे, बजरंग दलाची शहराध्यक्ष अजिंक्य तारू, नितीन अवचार, बजरंग सेना उमेश शेळके, रवींद्र बैनाडे श्रीराम मंदिर ट्रस्ट राजेंद्र क्षीरसागर, यांच्याशी चर्चा करून लवकरच सर्वांची एक संयुक्त बैठक घेऊन मंदिर बांधकाम व मंदिर सुरक्षा बाबत योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या.

मंदिराचे काम कसे लवकर सुरू होईल यासाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न करणार असल्याचे बैठकीत ठरले. जी घटना झाली तिचा निषेध करून अशा घटना पुन्हा होऊ नये त्यासाठी मंदिर ट्रस्टी यांनी या परिसरात लक्ष देण्याची सूचना यावेळी त्यांना देण्यात आल्या. संपूर्ण शिरूर परिसरात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठवण्यात आला होता. तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांनी या परिसराची पाहणी केली.

संबंधित घटना निंदनीय असून या घटनेचा सखोल तपास करावा, अशा सूचना देऊन मंदिर ट्रस्ट यांनी मंदिराबाबत गंभीरता घेऊन मंदिराची सुरक्षा व सौंदर्य जपण्यासाठी प्रयत्न करावे. लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार करावा त्यासाठी मदत करणार.
– ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, आमदार, शिरूर.

शिरूर येथील राम मंदिर खूप जुने मंदिरातून या मंदिराबाबत नागरिकांच्या भावना जोडलेले आहेत. शिरूर शहर जातीय सलोखा जपणारे शहर आहे या शहरात अशा प्रकारे घटना घडल निषेधार्थ आहे. त्याचा निषेध करतो. तर या मंदिराचे बांधकाम व सुरक्षा यासाठी ट्रस्टींनी येणाऱ्या अडचणी सोडवून लवकरात लवकर ही कामे सुरू करावी.
– ॲड. अशोक पवार, माजी आमदार.

शिरूर शहरातील सर्व मंदिरे व पोलीस तहसीलदार यांची बैठक घेऊन सर्वच मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक नेमावे यासाठी सूचना देण्यात येणार असून, राम मंदिर ट्रस्टी यांना मंदिराचे काम करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडून लवकरात लवकर काम करावे यासाठी सूचनाही देण्यात आले आहे.
– प्रशांत ढोले, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी.

श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने या भागात कॅमेरे लावून लवकरात लवकर या मंदिराची दुरुस्ती व सुरक्षा भिंतीचे काम करणारा असल्याचे सांगितले. एक सुरक्षारक रक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
– सिद्धेश्वर बगाडे, अध्यक्ष, श्री राम मंदिर ट्रस्ट.

शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व आंदोलन व मंदीर ट्रस्ट यांना सूचना देण्यात आले असून या परिसरात लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षकाची दिवस-रात्र नेमणूक करावी असे लेखी आदेश दिले आहे. सुरक्षा भिंतीचे काम करण्यात यावे.
– संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर.

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…

शिक्रापुरच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला, उपचारापुर्वीचं मृत्यू

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

शिरूर पोलिसांनी २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीला केले गजाआड…

Video; शिरूर! जमिन मोजणीच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न…

बापरे! शिरूर शहरात तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago