Shirur Police Station

शिरूर पोलिसांनी २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीला केले गजाआड…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील एका सराफी दुकानातून सोन्याची अंगठी लांबवणाऱ्या चोरटयास शिरूर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, नोव्हेंबर रोजी शहरातील भवरीलाल जुगराज फुलफगर सराफ ॲंन्ड ज्वेलर्स दुकानामधून ७०,०००/- रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरटयाने चोरून नेल्याची घटना घडली होती. या बाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास शिरूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकामधील अंमलदार करीत होते. सदर गुन्हयाचे अनुशंगाने शिरूर शहरामधील सुमारे २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमे-याची तपासणी करत असताना संशयीत आरोपीने गुन्हा केल्यानंतर एका हॉटेलमध्ये पेटीएम ला ऑनलाईन पैसे पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुशंगाने पेटीएम मधुन सदर ऑनलाईन पैसे पाठवलेली माहीती काढता सदरचे पैसे किरण आनंदा नगरे (रा. बाबुराव नगर, शिरूर) याने पाठवल्याचे समजले.

सदर संशयीत आरोपी बाबुरावनगर, शिरूर येथे राहण्यास असल्याचे समजल्याने त्या ठिकाणी तपास पथकामधील अंमलदार यांनी सापळा लावून किरण आनंदा नगरे (रा. बाबुराव नगर, शिरूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे. सदर गुन्हयात चोरी गेलेली ७०,०००/- रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ही आरोपी याच्या कडुन जप्त करण्यात आली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार उमेश भगत हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकामधील सहा. पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस हवालदार उमेश भगत, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रघुनाथ हळनोर, निखील रावडे, अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

शिक्रापुरच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला, उपचारापुर्वीचं मृत्यू

बापरे! शिरूर शहरात तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा…

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

Video; शिरूर! जमिन मोजणीच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न…

शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले