शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुरचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची आज (दि १) रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास एका अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करत निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असुन यामुळे शिक्रापुर परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. यानंतर त्यांना पुणे येथे खाजगी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तसेच मालमत्ता अथवा अनैतिक संबंधाच्या कारणांमधून ही हत्या झाल्याचा अंदाज असुन हल्लेखोर यांची नावे व संख्या निष्पन्न झाली नसून पोलीस पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली.
शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले