मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात तब्बल ४० किलो वजनाचा व १५-२० फुटांचा अजगर; शेळी गिळली…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील गोलेगावच्या महाजनमळा परिसरात दरावस्ती येथे तब्बल ४० किलो वजनाचा आणि अंदाजे १५ ते २० फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सतिश वाखारे यांच्या शेजारील शेतात हा अजगर निवांत पडलेला दिसताच ग्रामस्थांची गर्दी झाली.

यावेळी पाहणीदरम्यान समोर आले की अजगराने एक शेळी पूर्णपणे गिळल्याची घटना घडली असून त्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सर्पमित्रांनी अत्यंत दक्षता आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला पकडत त्याच्या पोटातील शेळीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी अजगर आक्रमक झाला. बचाव मोहिमेदरम्यान शेळी गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अजगरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व नागरिकांनी वनविभागाला तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षितरीत्या पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गोलेगाव महाजनमळा परिसरात एवढ्या मोठ्या अजगराचे दर्शन पहिल्यांदाच झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. जंगलपट्ट्यापासून दूर असूनही एवढ्या आकाराचा अजगर कसा आला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शिरूर तालुक्यातील परिसरात वन्यजीवांची वाढती वर्दळ हा गंभीर विचाराचा विषय असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

Video: हेल्मेटमध्ये लपलेला कोब्रा चावला दुचाकी चालकाला…

थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago