Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बिबट्याचा वावर असलेल्या संवेदनशील भागांमध्ये मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर एकूण १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI Based) अलर्ट सिस्टीम बसविण्यात आल्या आहेत.

या प्रणालीत बिबट्याच्या शरीरावरील पॅटर्न ओळखला जातो आणि तो त्या मार्गावरुन गेल्यास त्वरित सायरन वाजतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना बिबट तेथे असल्याची कल्पना मिळते आणि ते सावध राहू शकतात. परिणामी जीवितहानी आणि संघर्षाची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे.

हि अलर्ट सिस्टीम पिंपळाचा मळा मांडवगण फराटा, फराटेवाडी मांडवगण फराटा, शिवनगर इनामगाव, फिरंगी मळा पिंपळसुटी, घायतडक वस्ती करडे, अन्नापुर, संगमवाडी मसे बुद्रुक, आमदाबाद, निमोणे, निमगाव दुडे, जांबुत आणि पिंपरखेड या १२ ठिकाणी बसविण्यात आली आहे.

हा उपक्रम जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे तसेच शिरुर वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातुन यशस्वी करण्यात आला. वन्यजीव संवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याचा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.

शिरुर; विद्युत वाहिनीवर बेकायदेशीर जाहिरात फलक; महावितरणची पोलिसांकडे तक्रार

शिरुर; विद्युत वाहिनीवर बेकायदेशीर जाहिरात फलक; महावितरणची पोलिसांकडे तक्रार

शिरुरमध्ये महिलांसाठी डिजिटल आर्थिक साक्षरता मास्टर ट्रेनर प्रशिक्षण; ३० महिला बनल्या “ई-दोस्त”